टीम मंगळवेढा टाईम्स।
परस्पर बचत गटाचे पैसे उचलले, या कारणास्तव पत्नीचा खून करून मृतदेह पिंपळनेर (ता. माढा) येथील वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची घटना घडली आहे.
बुधवार, दि. २७ डिसेंबर रोजी याबाबत फिर्याद विजय विठ्ठल गायकवाड (वय ३१, रा. कुसळंब, ता. बार्शी, जि. सोलापूर) याने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२२ डिसेंबर रोजी मृत संगीता नवनाथ डमरे (रा. आगळगाव, ता. बार्शी) हिला परस्पर बचत गटाचे पैसे का उचलले व घरातील पैसे का खर्च केले,
या कारणावरून फिर्यादीचा दाजी नवनाथ ज्ञानोबा डमरे याने त्याचा मित्र धनु वैजनाथ उकरंडे (दोघे रा.आगळगाव, ता.बार्शी) याच्या मदतीने कोठेतरी गळा दाबून मारहाण करून जीवे ठार मारून प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी
प्रेत पिंपळनेर (ता. माढा) येथील कॅनॉलमध्ये फेकून दिल्याने दोन्ही संशयीतावर दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे.
दि. २२ रोजी मृत संगीता नवनाथ डमरे हिने ती आढेगांव (ता.पंढरपूर) येथे आली असल्याचा फोन भावजीस केला होता.
ती मिळून न आल्याने नातेवाईक यांच्याकडे तपास केला होता. मात्र, ती मिळून आली नाही, असे फिर्यादीत नमूद आहे. अधिक तपास पोसई नाळे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज