टीम मंगळवेढा टाईम्स ।
बच्चु कडू राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त बोराळे येथे एक झाड गावांसाठी माझं गाव माझी जबाबदारी हा उपक्रम वर्क्षारोपण करून राबवण्यात आला.
त्याच बरोबर मंगळवेढा तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांचा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमातील सप्ताहाचे पहिले पुष्प बच्चु भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मौजे बोराळे व बोराळे परिसरात 101 झाडांची लागवड करून वृक्षारोपणाची सुरुवात केली.
पुढील झाडे टप्या टप्याने लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
वृक्षारोपणाचा शुभारंभ राजश्री पाटील.पोलीस उपविभागीय अधिकारी मंगळवेढा. जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते, बोराळे गावचे मि. सरपंच विनोद पाटील, प्रा. संतोष पवार प्रहार युवा जिल्हाध्यक्ष यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील मॅडम म्हणाल्या की, *सध्याचे काळात वृक्षलागवड फार महत्त्वाची आहे आणि ते वृक्ष टिकवणे ही काळाची गरज आहे.
त्याचबरोबर प्रहारचे जिल्हा युवा अध्यक्ष प्रा.संतोष पवार असे म्हणाले की, बच्चु भाऊंच्या वाढदिवसानिमित्त निरनिराळे उपक्रम होणार आहेत.परंतु बोराळे गाव व परिसरातील वृक्षलागवड ही संस्मरणीय ठरावी. व भविष्यात ती सर्वांना सावली देत राहोत.
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी म्हणाले की, 5 जुलै हा आमच्या दैवताचा वाढदिवस आहे. आणि त्यानिमित्ताने वृक्षारोपण करून आम्ही वाढदिवस साजरा करणार आहोत.
बोराळे गावचे जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचे काम या जि.प. गटांमध्ये सुरू आहे आणि त्यांचे कार्य असेच वाढत राहो.
तसेच गावचे सरपंच विनोद पाटील साहेब यांचेही कार्य अतिशय सुरेख आहे त्यांच्या पुढच्या कामासाठी शुभेच्छा, यापुढे सामाजिक कार्यास अशाच प्रकारे प्रोत्साहन व मार्गदर्शन तसेच सहकार्य त्यांनी करावे.बोराळे गावात नोकरदार वर्गाची संख्या मोठी आहे तेही आम्हाला सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
बच्चु भाऊ यांच्या मते प्रहार म्हणजे सेवा , त्याग, समर्पण आणि याच मार्गाने सेवेचे काम आम्ही हाती घेतले आहे.
आज आमचे सहकारी मित्र बापू घोडके सारखा व्यक्ती दोन्ही हाताने अपंग असून सुद्धा दोन दिवसापासून रात्रंदिवस माझ्यासोबत आहेत त्यांची काम करण्याची तळमळ पाहून मी सुद्धा भारावून गेलो त्याचबरोबर प्रशांत पोपळकर ज्यांची परिस्थिती हलाखीची असून ,ज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असून सुद्धा स्वतःचा उदरनिर्वाह टमटम चालवल्या शिवाय चालत नाही.
यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं यांनी दाखवून दिलं की मनामध्ये काम करण्याची भावना असेल तर परिस्थिती कशी का असेना आपण करू शकतो , त्याचबरोबर नवनाथ शिरसटकर , आकाश मोहिते, कैलास पाटील, मदार ढालाईत ,हैदर इनामदार, नागू म्हमाने, अमोगसिद्ध काकण की, महेश तळ्ळे, प्रवीण कोरे, राहुल धनवे, या सर्व सर्वसामान्य कुटुंबातील मित्रांनी दिवसभर कष्ट करून सहकार्य केले.
बच्चू कडू साहेबांचं काम जेव्हा मी युट्यूब वर पाहिलं तेव्हा भारावून गेलो वाटलं की आपल्या विचाराचा माणूस आहे, पण डोक्यात विचार आला, कि हा माणूस फक्त बोलतो, की त्या पद्धतीने काम करतो हे पाहण्यासाठी मी यवतमाळला नुकत्याच खासदारकीसाठी उभा राहिलेल्या वैशालीताई येडे यांच्या प्रचार साठी गेलो , सहा दिवस मी बच्चु भाऊ बरोबर होतो.
त्यांची काम करण्याची पद्धत स्वतः बघत होतो रात्रंदिवस तो माणूस काम करत होता.
त्या ठिकाणचे तापमान सुद्धा 45 ते 50 डिग्री च्या वरती होतं तरीसुद्धा हा माणूस भर उन्हात प्रचारासाठी दौरे काढत होता, फिरत होता, प्रचार करत होता, सर्व कार्यकर्त्यांसोबत त्यांच्यात मिसळून काम करायच , त्याच ठिकाणी जेवायचं, त्याच ठिकाणी बसायचं आणि त्यांच्याच बरोबर जमिनीवरती अंथरून टाकून झोपत होता यामुळेच हा नेता सर्व कार्यकर्त्यांना आपल्या पैकी एक असल्या सारखा वाटत होता.
भाऊ सांगतात की काम करण्यासाठी पद महत्वाचं नाही तर काम महत्वाच आहे. त्याचवेळी ठरवलं की अशा माणसासाठी काम करून या माती साठी जी आपली जबाबदारी, कर्तव्य आहेत ती पार पाडायची.
मित्रांनो आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याची जाणीव आपल्याला नाही.
स्वतंत्र मिळवण्यासाठी लाखो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिले भगतसिंग, सुखदेव राजगुरू, यांच्या सारख्या अनेक तरुणांनी आपल्या ऐन तारुण्यात देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
आज परिस्थिती तशी नाही. आज आपल्याला ना फासावरती जायचं आहे ना कोणाला गोळ्या घालायच्या आहेत.
आज आमच्या सोलापूर जिल्ह्यात देखील एखादा बच्चु कडू निर्माण झाला पाहिजे.अशी आशा व्यक्त केली.
यावेळी मंगळवेढा पंचायत समिती चे मा. सभापती बाबासाहेब पाटील, बोराळे गावचे माझी सरपंच दिलीपकुमार धनवे आणि शिवशंकर कवचाळे,प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर महिला जिल्हा उपाध्यक्ष आश्र्विनीताई पाटील, प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर चे प्रसिद्धी प्रमुख राजू सावंत,
प्रहार शेतकरी संघटना मंगळवेढा तालुकाध्यक्ष सचिन गरंडे, बोराळे गावचे उपसरपंच संतोष गणेशकर,
प्रहार रुग्णसेवक सिद्धेश्वर पाटील,
नूतन हायस्कुल बोराळे चे मुख्याध्यापक रवींद्र वाघमारे सर,
जिल्हा परिषद शिक्षक पांडुरंग कुलकर्णी गुरूजी आणि संदीप म्हमाणे, नूतन हायस्कुल चे शिक्षक संजय कवचाळे सर, मा. सदस्य नागेश पाटील, विद्यमान ग्रा.सदस्य चनविर लंगोटे,राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे मा. तालुकाध्यक्ष पृथ्वीराज भोजने,प्रहार अपंग क्रांती मा.तालुका उपाध्यक्ष बापू घोडके, दत्ता कोरे, बंडू कोळी, हैदर इनामदार, युवा नेते सतीश भोसले, संभाजी मस्के, बाबालाल इनामदार,
प्रशांत पोपळकर, विभाग प्रमुख गुरुनाथ शिवशरण, प्रहार सैनिक नवनाथ मासाळ आणि सचिन साळुंखे, कैलास पाटील, महेश तळ्ळे, आकाश मोहिते, प्रवीण कोरे, आप्पा धनवे,उत्तम सरडे मा. तालुका उपाध्यक्ष समाधान गंगधरे विनोद शिवशरण, सर्जेराव पाराध्ये, नवनाथ शिरसटकर,
अपराया काकणगी राहुल धनवे, मदार ढालाईत, बाबा इनामदार,अण्णा चौगुले, लखन स्वामी,नागनाथ म्हमाणे, दत्तात्रय कोरे,अमृत पवार, त्याच बरोबर बोराळे गावचे उपसरपंच व सर्व सदस्य व सर्व बोराळे पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज