टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापुरातील मोहोळ येथे अंगावर काटा आणणारी घटना घडलीय. चार वर्षाच्या लहान बहिणीला कडेवर घेत ट्रॅक्टरवर चढताना मोठ्या बहिणीचा पाय गेअरवर पडल्यानं ट्रॅक्टर दोन्ही बहिणींच्या अंगावरून गेला.
या अपघातात दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या हद्दीत ऊस तोडीच्या फडात शनिवारी (दि.7 डिसेंबर) रोजी ही घटना घडली.
निता राजु राठोड आणि अतिश्री राजु राठोड असे मृत झालेल्या दोन बहिणींची नावे आहेत. मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या मुलींचे पालक त्यांच्या पाच मुली आणि एक मुलगा अशा 8 जणांचा ऊसतोड मजुरी करून उदरनिर्वाह करतात.
ऊसाच्या बांधांवर असणारा ट्रॅक्टर चालकाने तसाच सुरु ठेवल्यामुळे निष्काळजीपणातून हा अपघात झाल्याची तक्रार या मुलींची आई शानुबाई राठोड यांनी केली होती. यावरून मोहोळ पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. ऊसतोडीच्या फडात काम करताना आपल्या चार वर्षांच्या बहिणीला कडेवर घेत मोठी बहीण निता राठोड (20) चालू ट्रॅक्टरवर चढत होती. लहान्या अतिश्रीला घेऊन चढताना निताचा पाय ट्रॅक्टरच्या गिअरवर पडला. यामुळे ट्रॅक्टर पुढे गेल्याने दोन्ही बहिणी खाली पडल्या. ट्रॅक्टरखाली आल्यानं दोन्ही बहिणी चालू असलेला ट्रॅक्टर दोघींच्याही अंगावरून गेला. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाल्या.
चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात
या प्रकरणी मुलींची आई शानुबाई राठोड यांनी ट्रॅक्टर चालक सुनील राठोड यांच्यावर स्वतःच्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालू ठेवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, शानुबाई राज राठोड रा पाटागुडा ता. जिवती जि. चंद्रपूर या पती राजु राठोड मुली ज्योती, निता, अतिश्री, भाग्यश्री, गिता व एक मुलगा अभिनंदन असे एकत्रीत राहतात. ते ऊसतोड मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
राजू राठोड हे लोकनेते साखर कारखाना अनगरच्या माध्यमातून ऊस वाहतुकीस असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.24/डी.7147 या सोबत ऊस तोडणीचे काम करतात. ऊसाच्या बांधवर असलेला टॅक्टर क्र. एम एच. 24/डी.7147 हा चालक सुनिल गुलाब राठोड रा. डिगरस ता. कंदार जि. नांदेड याने तसाच चालू ठेवला होता.
दरम्यान त्या ट्रॅक्टरमध्ये निता राजु राठोड (वय20) ही लहान बहिण अतिश्री (वय 4 वर्ष) हिला कंबरेवर घेऊन चढ़त असताना चालू असलेल्या ट्रॅक्टरच्या गेअरवर तिचा पाय पडला. त्यामुळे अचानक गिअर पडून ट्रॅक्टर पुढे गेला. त्यामध्ये दोघीही खाली पडल्या. चालू असलेला ट्रॅक्टर दोघींच्याही अंगावरून गेला. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज