मंगळवेढा टाईम्स न्युज।
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानाला गती देण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक गुणांकन असलेल्या 5

अशा एकूण ५५ गावांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान हे पुरस्कार अभियान ग्रामविकास विभागाकडून राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे.

त्याला गती देण्यासाठी प्राधान्याने जिल्ह्यातील ५५ गावांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या गावावर विशेष लक्ष देऊन विविध योजनेच्या माध्यमांतून गावात विकासकामे करण्यात येणार आहेत.

त्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तशा सूचना देण्यात आल्या आहेत. लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन, स्वनिधी, सामाजिक दायित्व, लोक वर्गणीतून पंचायत राज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे,


जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजीविका विकास, सामाजिक न्याय लोकसहभाग आणि श्रमदान,

लोक चळवळीतून गावचा विकास करणे हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियानाचे मुख्य घटक आहेत. त्यामुळे या अनुषंगाने तयारी करण्यात येत असल्याचे जंगम यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













