मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
राजलक्ष्मी महिला पतसंस्थेच्या चेअरमन सौ.कविता लिंगाण्णा पाटील व लिंगाण्णा पाटील यांनी आपल्या गावात सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
मुंढेवाडी जिल्हा परिषद शाळेस त्यांनी 5 हजार रुपयांची देणगी दिली आहे. राजलक्ष्मी महिला पतसंस्था नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते. मंगळवेढा तालुक्यातून या उपक्रमाची प्रशंसा केली जात आहे.
मुंढेवाडी ता.मंगळवेढा येथील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या व गरजवंताला,छोटे व्यापारी व उद्योगांना कायमच मदतीचा हात पुढे करणाऱ्या राजलक्ष्मी महिला पतसंस्थेच्या वतीने
काल शाळेच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून शाळेमधील विविध उपक्रम तसेच शालेय उपयोगी वस्तू आणण्यासाठी पतसंस्थेच्या वतीने शालेय समितीचे अध्यक्ष विकास ठेंगील यांच्याकडे रक्कम 5 हजार रुपये पतसंस्थेतर्फे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.कविता पाटील, मुख्याध्यापक रंगनाथ पाटील, संदीप धुमाळे, शिक्षक पंचायत समितीचे धसाडे साहेब तसेच शालेय समितीमधील विविध पदाधिकारी, विद्यार्थी,अंगणवाडी सेविका, मदतनीस, बालचमू व ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
काल शाळेच्या पहिल्याच दिवशी राजलक्ष्मी महिला पतसंस्थे तर्फे जि.प शाळेतील विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्याठी 5 हजार रोख रक्कम मिळालेबद्दल शाळाव्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांचेतर्फे पतसंंस्था व्यवस्थापक लिंगाणा पाटील व सर्व पतसंस्था स्टापचे अभिनंदन करण्यात आले.
समाजातील वंचित घटकासाठी आपण काहीतरी केले पाहिजे
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत त्यांचा सामाजिक,भावनिक,शैक्षणिक,विकास व्हावा,आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजातील वंचित घटकासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना मुलांमध्ये रुजावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. – सौ.कविता लिंगाण्णा पाटील, चेअरमन, राजलक्ष्मी पतसंस्था,मुंढेवाडी
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज