मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे आज होणाऱ्या महालिंगराया यात्रेसाठी पाच लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती राहणार आहे. सात पालख्यांचा भेट सोहळा भंडारा, खोबरे, लोकरीच्या उधळणीत होणार आहे. पंढरपुरातील कार्तिकी वारीपेक्षा अधिक भाविकांची गर्दी या ठिकाणी असते.

पोलिस प्रशासनाने बंदोबस्त कमी ठेवल्याचे ग्रामस्थांचे मत असून बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा या ठिकाणावरून भाविक खासगी वाहनाने येतात. ही संख्या जवळपास पाच लाखापेक्षा अधिक असते.

पंढरपूरच्या वारीसाठी सोलापूरशिवाय इतर जिल्ह्यातील अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी पोलिस निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक पोलिस कर्मचारी होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात केला जातो.

तितक्याच प्रमाणात भाविक परराज्यातून हुलजंतीत येत असल्याने महाराष्ट्राच्या प्रशासनाला याचा अंदाज बांधता येईना हे भाविक अन्य भाषिक असल्याने बंदोबस्तात असलेल्या कर्मचाऱ्यावर अतिरिक्त ताण व भाषेचा प्रश्न निर्माण होत असल्याने याचे नियोजन प्रशासनाने करून त्याप्रमाणे पोलिस बंदोबस्त तैनात करणे आवश्यक आहे. परंतु याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.

यात्रेसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व होमगार्डच्या माध्यमातून बंदोबस्त केला असला तरी गणेशोत्सव, पैगंबर जयंती, त्याचबरोबर नवरात्र उत्सव, हुनूर येथील भेट सोहळा त्याचबरोबर हुलजंतील भेटीच्या निमित्ताने पोलिसांना अहोरात्र बंदोबस्त करावा लागतो. एक तर वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात मंगळवेढा पुरेसे पोलिस दल नाही.

नंदेश्वर येथील पोलिस आउटपोस्टचे प्रश्न राजकीय पातळीवर प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वारीपेक्षा अधिक भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. यात्रेत आज होणारी भेट व भाकणूक याला महत्त्व असल्याने मोठी गर्दी उसळणार आहे.
नियोजन करून राज्यभर नेण्याची गरज
महामार्गामुळे रस्त्याची सुविधा उपलब्ध झाल्याने भाविकांची संख्या वाढविण्याच्या दृष्टिने या यात्रेचे ब्रेण्डिंग करणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीची यात्रा ज्या प्रमाणे राज्यभर प्रसिद्ध झाली. त्याप्रमाणे हुलजंतीची यात्राही प्रशासनाने नियोजन करून राज्यभर नेण्याची गरज आहे.- अनिल सावंत, चेअरमन, भैरवनाथ उद्योग समूह

बंदोबस्त तैनात
भेटीच्या कालावधीतील वाढती गर्दी लक्षात घेता डीवायएसपी, तीन पोलिस निरीक्षक ४ सहाय्यक पोलिस निरीक्षक, १४ पोलिस उपनिरीक्षक ११९ पोलिस कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात केला.- दत्तात्रय बोरिगिड्डे, पोलिस निरीक्षक
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














