टीम मंगळवेढा टाईम्स।
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोलापूर जिल्ह्यातील पाच उमेदवार निश्चित झाले आहेत. या उमेदवारांची नावे आज गुरुवारी रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटाकडून करमाळ्यात माजी आमदार नारायण पाटील, माळशिरसमधून उत्तम जानकर, शहर उत्तरमधून महेश कोठे यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे नियोजन करा असे आदेश देण्यात आले आहेत.
माढ्यातून आमदार बबनराव शिंदे यांचे नाव चर्चेत होते. बबनदादा आपले पुत्र रणजितसिंह यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.
पवार गटाकडून अभिजित पाटील यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. पंढरपूरमध्ये अनिल सावंत, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके यांच्या नावाची चर्चा आहे.
यात भालके यांचे नाव निश्चित झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. मोहोळमधून प्रशासकीय अधिकारी शैलेश कोतमिरे, राजू खरे आणि संजय क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा आहे.
पंढरपूरची चर्चा कुठे फिस्कटतेय
पंढरपूर मतदारसंघात शरद पवार गटाकडून माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव चर्चेत आहे. परिचारक गटाचे कार्यकर्ते अनेक दिवसांपासून मतदारसंघात पवार गटाचे चिन्ह घेऊन फिरत आहेत.
परिचारक गटाचे कार्यकर्ते काही दिवसांपूर्वी शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही भेटून आले. परंतु, उमेदवारीची चर्चा पुढे गेलेली नाही.
पवार गट आणि परिचारक गटात समन्वयक घडवून आणण्याचे काम जिल्ह्यातील एक पदाधिकारी करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि प्रशांत परिचारक यांची भेट निश्चित झाली होती.
ही भेट प्रत्यक्षात झाली नाही. त्यामुळे उमेदवारीचा विषयही पुढे जाऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नव्या हालचाली होतील, अशी कुजबुज आहे. या हालचालींकडे मोहिते-पाटील गटाचेही लक्ष आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज