मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच महिन्यांपासून घसरणीचा ट्रेंड आहे. गेल्या काही दिवसात मोठ्यासह छोट्या गुंतवणुकदारांनी आपल्या मेहनतीचे पैसे गमावले आहेत. बाजारातील या घसरणीच्या ट्रेंडवर अनेक जण गुंतवणुकदारांना पैसे गुंतवताना काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.
सेन्सेक्स आणि निफ्टत अनुक्रमे 13.23% आणि 14.19% इतकी घसरण झाली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स 40 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. याचा सर्वाधिक फटका लहान गुंतवणूकदारांना बसला आहे.
शेअर बाजारात पैसे गुंतवले तर इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा वेगाने आणि जास्त रिटर्न मिळतात अशा आशेवर अनेक जण बाजारात पैसे गुंतवतात मात्र याचा सर्वांनाच फायदा होतो असे नाही. शेअर बाजारातील सध्याच्या घसरणीमुळे 16 लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झालेल्या एका 28 वर्षीय तरुणाने बुधवारी स्वत:चा जीव घेतला.
नाशिकमधील चांदवड तालुक्यातील विटाई गावातील राजेंद्र कोल्हे याने शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. राजेंद्रने स्वत:च्या पगारातून पैसे गुंतवले होते. मात्र शेअर बाजारातील या घसरणीचा त्याला मोठा फटका बसला. बाजारात पैसे गुंतवण्यासाठी त्याने अनेकांकडून पैसे देखील घेतले होते.
राजेंद्र हा एका खासगी गुंतवणू्क कंपनीत काम करत होता. त्याने पैसे गावी न पाठवता शेअर बाजारात गुंतवण्यास सुरुवात केली होती. त्याची ही गुंतवणू्क काही लाखांत पोहोची होती. दरम्यान बाजार कोसळू लागला त्याचा मोठा फटका राजेंद्रला बसू लागला. त्याने नोकरी बदलून एका खासगी बँकेत काम सुरू केले.
राजेंद्रला बाजारातील घसरणीचा मोठा फटका बसला ज्यामुळे तो नैराश्यात गेला होता. बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी त्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले आणि दुपारी पिंपळगाव बहुला येथील ज्योती विद्यालयाच्या मोकळ्या परिसरात
अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र 90 टक्क्यांहून अधिक भाजलेल्या राजेंद्रचा रात्री उशिरा मृत्यू झाला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज