mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील आई-बाबा गमावलेले अनाथ बालके शोधा; जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना, हेल्पलाईन क्रमांक केला जारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 15, 2021
in सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोविड संसर्गामुळे पालक गमावलेली बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा गुन्हेगारी कारवायांत ओढली जाऊ नयेत याची दक्षता राज्य शासनातर्फे घेतली जात आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये सोलापूर जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी निवासस्थानी असलेल्या कार्यालयात झाली. त्या बैठकीत श्री. शंभरकर यांनी सूचना दिल्या.

सोलापूर जिल्ह्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेली मुले आहेत का, असल्यास कोणत्या तालुक्यात आहेत याची वस्तुस्थिती व सत्यता पडताळून घेण्याचे निर्देश श्री. शंभरकर यांनी दिले.

याबाबत सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी व मनपा उपायुक्त, ग्रामीण भागासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी अनाथ बालके असल्यास त्याबाबतची माहिती टास्क फोर्सला सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.

सोलापूर जिल्ह्यातील बालग्रहातील सर्व कर्मचारी यांचे लसीकरण करावे, बालकांची विशेष काळजी घ्यावी, निरीक्षणग्रहांना आवश्यक असणारा निधी वेळेत उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.

बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. शशिकांत मोकाशी, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले,  महिला व बालविकास अधिकारी विजय खोमणे, अनुजा कुलकर्णी,  महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी उपस्थित होते.

बालकांच्या समस्यांबाबत संपर्क क्रमांक

चाईल्ड हेल्पलाइन 1098, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नियंत्रण कक्ष ०२१७- २७३२०००, २७३२०१०, अनुजा कुलकर्णी, अध्यक्ष बालकल्याण समिती ९४२३३३०४०१, विजय खोमणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ८६०५४५३७९३, आनंद ढेपे ९८८१४९०२२६, दीपक धायगुडे ७३८७२६७९२२, जयाप्रदा शरणार्थी ७९७२५५०४२३, ,शोभा शेंडगे ९६८९९५८६४५

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

संबंधित बातम्या

सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 8, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Next Post
खळबळ! वाहने अडवून पैसे वसूल करणारा मंगळवेढ्यातील तोतया पोलीस ताब्यात

ग्रामीण भागातून सोलापूर शहरात येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र बंधनकारक

ताज्या बातम्या

सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 8, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा