टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील बठाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनीषा विजय शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दि.5 मे रोजी विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर साळुंखे, प्रशासक बाळासाहेब बाबर, तलाठी चाफेकर व ग्रामसेवक प्रवीण कांबळे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली आहे.
तत्कालीन उपसरपंच बिभीषण बेदरे हे उपसरपंच असताना 8 सदस्यांनी यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता.
दि.20 जानेवारी 2022 रोजी अविश्वास ठराव बहुमताने संमत झाला होता त्यानंतर हे पद रिक्त होते.
उपसरपंच बिभीषण बेदरे यांनी अविश्वास ठरावाविरोधात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे अपील केले होते.
दि.21 एप्रिल 2022 रोजी अविश्वास ठराव विरुद्ध केलेले अपील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नामंजूर केले आहे. त्यानंतर उपसरपंच पद हे रिक्त होते.
बठाण गावचे सरपंच पद हे गेल्या दोन वर्षापासून रिक्त आहे. त्यामुळे त्या पदाचा अतिरिक्त कारभार हा उपसरपंचाकडे सोपविण्यात आला होता.
उपसरपंच पदासाठी गुरुवार दि.5 मे रोजी मनीषा विजय शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर बठाण ग्रामस्थांनी व तालुक्यातील सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज