टीम मंगळवेढा टाईम्स । उजनी धरणातून जवळजवळ 15000 क्युसेस पाणी भीमा नदीच्या पात्रातून सोडण्यात आले. जर ह्याच पाण्याचे नियोजन केले तर ग्रामीण भागातील जनतेला याचा फायदा होईल.
यासाठी वाया जात असलेले पाणी प्रशासनाने त्याचे योग्य नियोजन लाऊन,त्या पाण्याला योग्य दिशा द्यावी ते पाणी सर्व ग्रामीण भागातील पाझर तलाव भरून द्यावीत. जेणेकरून,जनावरांसाठी.आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटेल.
यासाठी प्रहार शेतकरी संघटना तळमळीने झटत असून प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन या मागण्या मान्य करून तळागाळापर्यंत पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी तसेच सर्व प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे मागणी केली.
प्रशासनाने लवकरात लवकर या विषयाकडे लक्ष घालावे मंगळवेढा तालुक्यातील 30 ते 40 पाझर तलाव, नाले, ओढे ,गाव तलाव हे लवकरात लवकर भरून द्यावे.
यासाठी आज उपविभाग अधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी, बोराळे विभागप्रमुख, अमोगसिद्ध काकनकी , सिद्धाराम म्हमाने ,बिळ्ळानसिंद्ध पाटील,अप्पाराया काकनकी, महेश तळ्ळे, उपस्थित होते.
Fill all the seepage lakes in Mangalwedha taluka; Demand for strike organization
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज