mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ब्रेकिंग! कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलीस निरीक्षकाविरुध्द गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 29, 2021
in क्राईम, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

दखलपात्र गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कर्तव्यात कसूर केल्याबद्दल न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक के.एन.पाटील यांच्या विरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे वृत्त असे की, सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक काशिनाथ सौदागर तळेकर यांची टेंभुर्णी येथे असणाऱ्या जमिनी मध्ये अनधिकृतपणे जेसीबीच्या साह्याने येथील शिवाजी केदार (अरण) यांनी पाच हजार रुपयाचे नुकसान केलेचा अर्ज १०/१०/२००९ रोजी तक्रारी अर्ज टेंभुर्णी पोलीस स्टेशनला देण्यात आला होता.

तत्कालीन प्रभारी पोलीस स्टेशन अधिकारी धनंजय जाधव यांनी दखलपात्र गुन्हा नोंद करणे बंधनकारक असताना अर्जदाराच्या खबरी वरून गुन्हा नोंद केला नाही. यानंतर तळेकर यांनी पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे जाधव यांच्याविरुद्ध १५ / १० / २००९ रोजी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली.

पोलीस अधीक्षक यांनी विभागीय पोलीस अधिकारी करमाळा यांच्याकडे गुन्हा नोंद करणे बाबत आदेश दिले. त्यानुसार चौकशी करून विभागीय पोलीस अधिकारी बंडगर यांनी सदर आरोपी विरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंद केला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दखलपात्र गुन्हा दाखल करून आरोपीला शिक्षेपासून वाचण्यासाठी बनावट नोंद अर्ज रजिस्टरमध्ये केली. त्यामुळे क्रिमिनल प्रोसीजर कोड कलम १५४/१ मधील तरतुदीचा भंग केला म्हणून धनंजय जाधव यांच्यावर खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी तळेकर यांनी पोलिस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे केली.

त्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयने धनंजय जाधव यांच्यावरील कारवाईचे कागद उपलब्ध नाहीत, असे कळवले होते. त्यामुळे व्यथित होऊन तळेकर यांनी २० / ४ / २०१५ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय जाधव त्यांना सहाय्य करणारे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे पोलीस हवालदार प्रभाकर पाटील यांच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी के.एन.पाटील यांच्याकडे १४५ क प्रमाणे दखलपात्र गुन्ह्यांची खबर दिली होती.

प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी क्रिमिनल प्रोसिजरप्रमाणे दखलपात्र गुन्ह्याचे खबर बुकात गुन्ह्याची नोंद करणे बंधनकारक होते. पण तो त्यांनी दखलपात्र गुन्हा नोंद करण्याचे नाकारले.

यासंदर्भात वेळोवेळी विनंती करूनही गुन्हा नोंद केला नाही. तेव्हा तळेकर यांच्या तक्रारीवरून पोलीस महासंचालक यांनी दखलपात्र गुन्ह्यांच्या खबरीवर तात्काळ गुन्हा नोंद करावा, असे आदेश दिले होते.

परंतु पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी जाणीवपूर्वक आदेशाचे उल्लंघन केल्याने फिर्यादी तळेकर यांनी माढा न्यायालयात तक्रार दाखल केली. यावरून न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.(स्रोत:पुण्यनगरी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर पोलीस

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 3, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
Next Post
न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा, ठाकरे सरकारसाठी महत्त्वाचा दिवस; काय घडणार?

आक्रमक! विलीनीकरण करा, नाहीतर इच्छा मरणाला परवानगी द्या; सोलापुरातील संपकरी एसटी कामगारांची मागणी

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा