मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मुंबई येथे कार्यरत असलेले फौजदार मरवडे गावी येताच त्यांना ताप आल्याने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . दरम्यान त्या फौजदाराचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. Faujdar Negative from Mumbai on mangalwedha
सध्या राज्यभर कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई हे शहर सध्या रेड झोन असून या शहरामधून अन्य ठिकाणी गेल्यानंतर क्वारंटाइन होणे अपेक्षित असतानाही तो फौजदार थेट घरात गेल्याने गावात चर्चेला उधाण आले होते.
कायद्याचे पालन करणाऱ्यांकडूनच उल्लंघन होत असल्याने शेतच कुंपण खात असल्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे.
यापप्रकरणी प्रांताधिकारी विजयसिंह भोसले , उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज