मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
चॉकलेट खाण्यासाठी पैसे मागितल्याने निर्दयी जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. आरुषी बालाजी राठोड (४, रा. भीमातांडा, ता. उदगीर) असे मृत मुलीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत मुलीचा बाप हा नेहमी आपल्या पत्नीला मारहाण करून त्रास देत असल्यामुळे त्या त्रासाला वैतागून आपल्या मुलांसह माहेरी लिंबोटी, माळेगाव (ता. लोहा जि. नांदेड) येथे राहायला गेल्या होत्या.
बालाजी राठोड याने पत्नीच्या माहेरी जाऊन बायकोसोबत भांडण काढून ९ जून रोजी जबरदस्तीने न ऐकता एकट्या आरुषी या मुलीला भिमातांडा येथे आणले. तेव्हापासून ही चार वर्षीय मुलगी बापासोबत राहात होती.


दरम्यानच्या काळात मुलीला आई जवळ सोड म्हणून नातेवाइकांनी सांगितले तरीसुद्धा तो कोणाचेही ऐकत नव्हता. रविवारी दुपारी मृत मुलगी आरुषी हिने चॉकलेट खाण्यासाठी पैसे मागितले या कारणावरुन चिडलेल्या बापाने साडीने गळा आवळून फाशी देवून चिमुरडीला ठार मारले.



मृत मुलीची आई वर्षा व बालाजी राठोड (३० रा. भीमा तांडा ता उदगीर) यांच्या तक्रारीवरू उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम १०३(१) भारतीय न्याय संहीता २०२३ नुसार खुनाचा गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















