मंगळवेढा टाइम्स टीम । दारूच्या नशेत जन्मदात्या ७० वर्षीय वडीलांना मुलाने वडीलांच्या हातातील आधाराची काठी घेवून पाठीवर मारून गंभीर जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बिराप्पा बनसिध्द खांडेकर (रा.हुलजंती ) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. The father beat the drunken father with a stick and seriously injured him
या घटनेची हकिकत अशी , यातील फिर्यादी तथा जखमी बनसिध्द रामचंद्र खांडेकर हे हुलजंती येथील घरासमोर दारात पलंगावर बसले असताना आरोपी तथा मुलगा बिराप्पा याने दारूच्या नशेत शिवीगाळ करून तुम्ही येथे रहायचे नाही असे म्हणून फिर्यादीच्या हातातील आधाराची काठी हिसकावून घेवून वडिलांच्या हातावर , पायावर , पाठीवर मारून गंभीर जखमी केले.
फिर्यादीची पत्नी तथा आरोपीची आई रत्नाबाई भांडण सोडविण्यास मध्ये आली असता शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास पोलिस नाईक रविंद्र देशमुख हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज