परतीच्या पावसाने राज्यातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठं नुकसान झालेले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने आर्थिक पॅकेज जाहिर केले आहे. त्यावर विरोधकांनी ठिका करण्यास सुरुवात केलेली आहे.
अतिवृष्टी झालेल्या भागात जे नुकसानग्रस्त आहेत त्यांना ठाकरे सरकारने १० हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. मात्र ही मदत अपुरी आहे एवढ्याने शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही असं आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने आता केंद्राकडे अधिक मदतीसाठी पाठपुरावा करावा आणि राज्यातील विरोधी पक्षाने त्यासाठी पुढाकार घ्यावा असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नुकसानग्रस्तांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. मात्र ही मदत अपुरी असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
बंगला विकणे आहे.
मंगळवेढा येथील ३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज