मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आर्वी येथे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज देण्याची घोषणा केली.
तसेच, महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बिल कमी होणार आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र देशात पाहिलं राज्य ठरलं आहे, की ज्या राज्याने विजेचे बिल दर 5 वर्षांनी कमी करून दाखवले, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
दरम्यान, या ठिकाणी आमदार-खासदारांनी ज्या वेगवेगळ्या मागण्या केल्या आहे, त्यासाठी एक बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मी पण वर्धा जिल्ह्याचा काही काळासाठी पालकमंत्री होतो, त्यामुळे इथे विशेष लक्ष आहे, असेही त्यांनी म्हटले.
महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बिल कमी होणार आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र देशात पाहिलं राज्य ठरलं आहे, की ज्या राज्याने विजेचे बिल दर 5 वर्षांनी कमी करून दाखवले आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
लोअर वर्धा प्रकल्पावर पाचशे मेगा वॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. वर्धा जिल्हा सौर उर्जेच्या बाबतीत पूर्णतः स्वयंपूर्ण होईल. तर, नेरी मिर्झापुर गावाला संपूर्ण सौर ऊर्जा देण्यात आली आहे, असे म्हणत फडणवीसांनी येथील गावकऱ्यांचे अभिनंदन केले.
शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज
शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज देऊ अशी घोषणा केली होती, 80 टक्के महाराष्टात आता लवकरच दिवसा 10 तास वीज उपलब्ध करून दिली जाईल.
विहीर पुनर्भरण ही योजना जर हातात घेतली तर त्याचा फायदा होईल, विहिरींची पातळी वाढेल, आपण जर असाच उपसा करीत राहिलो तर आपलाही प्रदेश रेगिस्थान झाल्याशिवाय राहणार नाही, असा संभाव्य धोकाही फडणवीसांनी बोलून दाखवला.
प्रत्येक घरांवर सोलर लागेल
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शिवराजसिंह चौहान यांनी प्रत्येकाला घर देण्यासाठी पाऊल उचलले आहे. घराकरिता 2 लाख रुपये मिळतील हा निर्णय आपण केला आहे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लागेल. त्यामुळे, नागरिकांना मोफत वीज मिळेल, असेही फडणवीसांनी म्हटले.
विदर्भात 7 लाख कोटींची गुंतवणूक
ज्या मागण्या आर्वीसाठी आमदारांनी, खासदारांनी केल्या आहेत त्यावर मला विचार करावाच लागेल. बार्शी उपसा सिंचन योजनेच्या फाईलवर सही मी करून येथे आलो आहे, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे फडणवीसांनी सांगितले. नवीन रस्त्यामुळे कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाईल.
रोजगार उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे. दोओस येथील दौऱ्यानंतर जवळपास 7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. भविष्यात वर्धा जिल्ह्यासाठी ही गुंतवणूक फायद्याची आहे., असेही फडणवीसांनी म्हटले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज