mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांची तहसील व भूमी अभिलेख कार्यालयांची वारी थांबणार, जमिनींसंबंधी जुने उतारे फेरफार व सातबारा आता एका सर्च वर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 26, 2020
in राज्य
शेतकऱ्यांनी लक्ष द्या! वारसनोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटलं, की त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे आवश्‍यक ठरते; अन्यथा शेवटी लाखो रुपये मोजून खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक कोर्ट-कचेऱ्यांची वारी करावी लागते.

त्यामुळे खरेदीपूर्वी जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. यासाठी फेरफार, सातबारा व खाते उतारे मिळवावे लागतात.पूर्वी ही कागदपत्रे व जमिनीचा पूर्वेइतिहास मिळवण्यात अडचणी येत असत.

ही माहिती, सातबारा, फेरफार, खाते उतारे संबंधित तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत. आता ही माहिती शासनाने ऑनलाइन उलब्ध करून दिली आहे.संबंधित पोर्टलवर गेल्यावर आपल्याला आवश्‍यक जमिनीसंबंधीची माहिती मिळणे सोयीस्कर झाल्याने अनेकांची तहसील व भूमी अभिलेख कार्यालयांची वारी थांबणार आहे.

महाराष्ट्र सरकार ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे. सध्या या वेबसाईटवर 14 लाख 22 हजार 958 दस्तऐवज डाउनलोड केलेले असून वेबसाईटला व्हिजिट केलेल्यांची संख्या 5 लाख 17 हजार 196 आहे.

माहिती मिळवण्यासाठी आपल्याला aapleabhilekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. त्यात आपल्याला “लॉग इन आयडी’ आणि “पासवर्ड’ बटणांच्या खाली “मदत’ या बटणावरून वेबसाइटद्वारे डाउनलोड करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे उपलब्ध आहेत? माहिती शोधासाठी नवीन लॉगइन कसे तयार करावे? पासवर्ड कसा बदलावा? कोणत्या पॅरामीटर्सवर/मापदंडावर दस्तऐवज शोधणे शक्‍य आहे?

मूलभूत शोध आणि प्रगत शोधमध्ये काय फरक आहे? मूलभूत शोध पर्याय वापरून शोध कसा घ्यावा? प्रगत शोध पर्याय वापरून शोध कसा घ्यावा? “पुन्हा योजना’ बटण कधी वापरावे? आदींसंबंधीची मार्गदर्शक सूचना व आपल्या प्रश्‍नांची उत्तरे मिळतात.

आता या वेबसाईटवर जुने अभिलेख (फेरफार, सातबारा व खाते उतारे) असे पाहा… aapleabhilekh.mahabhumi.gov.in सर्च करा. महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
या पेजवरील ई-रेकॉर्डस्‌ पाहण्यासाठी e-Records (Archived Documents)

या पर्यायावर केल्यावर “महाराष्ट्र शासन – महसूल विभाग’चे पेज समोर येईल.
त्यात उजवीकडील “भाषा’ पर्यायावर क्‍लिक करून भाषा निवडा.
त्यानंतर डाव्या बाजूच्या चौकटी “लॉगइन’ व “मदत’ ऑप्शन येईल. तुम्ही वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून साईटवर जाऊ शकता.

नोंदणी केली नसेल “नवीन वापरकर्ता नोंदणी’वर क्‍लिक करा.

त्यानंतर या पेजवरील वैयक्तिक माहिती भरा जसे की तुमचं नाव, मधलं नाव, आडनाव, लिंग, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर आदी माहिती भरा.

त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता, मेल-आयडी, बर्थ डेट ही वैयक्तिक माहिती भरल्यानंतर सविस्तर पत्त्याविषयीचे रकाने भरा.

यानंतर लॉग इन आयडी तयार वेबसाईटच्या निर्देशानुसार लॉग इन आयडी तयार करा. निर्देशानुसार पासवर्ड टाका.

त्यानंतर एका चौकटीतील कुठल्याही एका प्रश्नाचं उत्तर द्या.

त्यानंतर पुढील चौकटीत दिलेली अक्षरे जसेच्या तसे Captcha चौकटीत टाईप करा.
मग शेवटी सबमिट बटण दाबा.
त्यानंतर स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्‍लिक करा व लॉगइन करण्यासाठी, असा मेसेज येईल. यावरील “इथे क्‍लिक करा’वर क्‍लिक करा.

आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं युजरनेम आणि पासवर्ड वापरून परत लॉग इन करा.
असा पाहा फेरफार उतारा…

वेबसाईटवर सात जिल्ह्यांपैकी एक जिल्हा निवडा. पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार, फेरफार उतारा, सातबारा, आठ-अ असे पर्याय निवडा. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
यानंतर गट क्रमांक टाका व “शोध’ या पर्यायावर क्‍लिक करा.

यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.

फेरफाराचं वर्ष, क्रमांक दिलेला असतो. त्यावर क्‍लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहा.
त्यानंतर पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्‍लिक करा.

त्यानंतर तुमचं कार्ट ओपन होईल. त्याखाली असलेल्या “पुढे जा’ या पर्यायावर क्‍लिक केलं की “डाउनलोड सारांश’ पेज ओपन होईल.
इथं “तुमच्या फाइलची सद्य:स्थिती उपलब्ध आहे’ असे दिसेल.

त्यासमोरील “फाइल पाहा’ या पर्यायावर क्‍लिक केलं की फेरफार पत्रक ओपन होईल.
पाहा जमिनीचा नकाशा ऑनलाइन…
पीएम किसान योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी कशी करायची? किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा? या कार्डचे नेमके फायदे काय? सातबारा उताऱ्यात महाराष्ट्र सरकारने केलेले 11 बदल, ऑनलाइन सातबारा उतारा कसा काढायचा? तो कसा वाचायचा? या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर तुम्ही क्‍लिक केलं की ते डाउनलोड होईल.

त्यानंतर फेरफार उतारा पाहू शकता. याच पद्धतीनं तुम्ही सातबारा असा अभिलेखाचा प्रकार निवडला आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रकिया केली तर जुना सातबारा उताराही इथं पाहू शकता.(सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: फेरफारसातबारा

संबंधित बातम्या

आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे, कुठे मिळेल, अर्ज कसा करावा? अर्जाची प्रक्रिया कशी असेल? प्रमाणपत्र काढण्यासाठी ‘ही’ आहेत आवश्यक कागदपत्रे

September 12, 2025
शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

सरकारी काम झाले सोपे! आता सरकारी सेवा थेट व्हॉट्सअपवर मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

September 12, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

September 12, 2025
आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत मोठा निर्णय झाला; गुन्हे मागे घेण्यासाठी आता नवा निकष

September 10, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

आनंदाची बातमी! महिलांना पीठ गिरणी मोफत मिळणार; राज्य सरकारचा निर्णय, कसा कराल अर्ज?

September 11, 2025

सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशनच्या बदल्यात मिळणार पैसे, ही एक अट असणार; नेमका काय होणार फायदा, कसा राबवला जाणार?

September 11, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

सर्वात मोठा पुरावा! मराठा आरक्षणाची लढाई आणखी मजबूत; मराठा-कुणबी एकच असल्याचा महत्वाचा पुरावा सापडला; कुणबी अन् मराठ्यांची ‘अशी’ नोंद

September 9, 2025
देशभरात संतापाची लाट! काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी

अभिमानास्पद कामगिरी! सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट

September 7, 2025
आज दिसणार वर्षातील अखेरचे चंद्रग्रहण, चुकून सुद्धा ‘हे’ काम करु नका

कामाची बातमी! चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे? आज किती वाजता लागणार चंद्र ग्रहण; जाणून घ्या सुतक काळ

September 7, 2025
Next Post
सरपंच पदासाठी होतीये रस्सीखेच! ‘या’ प्रवर्गातील जागा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न

सरपंच पदासाठी होतीये रस्सीखेच! 'या' प्रवर्गातील जागा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे, कुठे मिळेल, अर्ज कसा करावा? अर्जाची प्रक्रिया कशी असेल? प्रमाणपत्र काढण्यासाठी ‘ही’ आहेत आवश्यक कागदपत्रे

September 12, 2025
शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

सरकारी काम झाले सोपे! आता सरकारी सेवा थेट व्हॉट्सअपवर मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

September 12, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

September 12, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धू-धु धुतले! जुन्या भांडणाचा राग मनात धरून युवकावर पीव्हीसी पाइपने मारहाण; खिशातून जबरदस्तीने काढले पैसे; मंगळवेढा तालुक्यातील घटना

September 11, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

खळबळ! अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या मंगळवेढ्यातील ‘या’ ५ वाळू माफियांवरती गुन्हा दाखल; महसूल व पोलिसांच्या पथकाची कारवाई

September 11, 2025

धक्कादायक! प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवेढ्यातील महिलेचा मृत्यू; डॉक्टरसह सेविकेवर गुन्हा

September 11, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा