mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या आधी होणार? सरकार सकारात्मक असल्याची चर्चा; सरकार ‘या’ तीन कारणांमुळे कर्जमाफी करणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 2, 2024
in राज्य
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यातील सर्व शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. कर्जमाफीवरून अनेक चर्चाही सुरु आहेत. पण सरकार आता आचारसंहीता लागू होण्याच्या आधी कर्जमाफी करणार, ही खात्रीशीर माहीती या प्रक्रियेत काम करणाऱ्या सुत्रांनी दिली.

तसेच शेतकऱ्यांवर किती कर्ज आहे आणि कर्जमाफीसाठी किती पैसा लागणार? याची माहीतीही सरकारने गोळा केली, असेही त्यांनी सांगितले.

सरकार तीन कारणांमुळे कर्जमाफी करणार आहे. पहिलं म्हणजे शेतकऱ्यांची सरकारच्या धोरणावरील नाराजी, दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी दिखवलेला इंगा आणि तिसरं म्हणजे कर्जमाफीवर अडून बसलेले शेतकरी, या तीन कारणांमुळे सरकार निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करेल.

म्हणजेच काय? तर विधानसभा निवडणुकीसाठी मास्टरस्ट्रोक म्हणून कर्जमाफीचा वापर करता यावा यासाठी निवडणुकीची आचारसंहीता लागू होण्याच्या तोंडावर कर्जमाफी जाहीर होऊ शकते. पण सरकारने निवडणुकीच्या आचारसंहीतेच्या तोंडावर कर्जमाफी जाहीर केली तर अधांतरीच राहू शकते. जसं भावांतरचं झालं.

तुम्हाला आठवत असेल की, आपल्याच राज्य सरकारने, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता लागू होण्याच्या आधी भावांतर योजना जाहीर केली होती. त्यानंतर आचारसंहीतेमुळे भावांतरचे पैसे देता येत नाही, असेही सरकारने सांगितले होते.

पण मुळात भावांतर योजना जाहीर करण्याची वेळच चुकली होती, हे सर्वजण सांगत होते. पण शेतीमालाच्या भावावरून शेतकऱ्यांची वाढेलेली नाराजी दूर करण्यासाठी सरकारने योजना जाहीर केली होती. आता सरकार याविषयी बोलतही नाही. कारण सरकारलाही माहीत आहे भावांतर योजना आता राबवता येणार नाही. पण शेतकरी भावांतरचा पिच्छा सोडत नव्हते म्हणून सरकारने कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी ५ हजार रुपये जाहीर केले.

अगदी तसचं सरकारने आचारसंहीतेच्या आधी कर्जमाफी जाहीर केली तर आंचरसंहीतेमुळे याची अंमलबजावणी होणार नाही. म्हणजेच निवडणुकीसाठी मास्टरस्ट्रोक म्हणून कर्जमाफीची घोषणा होऊ शकते.

पण कर्जामाफीची प्रत्यक्ष अमंलबजावणी नवं सरकार आल्यानंतर होईल. पण एकदा निवडणुका संपल्या की नियम-अटींमध्ये कर्जमाफी अडकायला नको. तसेच सरकार बदलल्यानंतर कर्जमाफीच्या घोषणेला अर्थही राहणार नाही. याचा अनुभव यापुर्वी शेतकऱ्यांना अनेकदा आलेला आहे.

त्यामुळे कर्जमाफी केवळ निवडणुकीसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी करायची असेल तर ती आताच जाहीर होणे आवश्यक आहे. त्याची अंमलबाजावणीही निवडणुकीची आचारसंहीता लागू होण्याच्या आधी होणे गरजेचे आहे. तरच सरकारच्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना चांगला होईल.

दुसऱ्या बाजुला सरकारने आधीच शेतकऱ्यांसाठी काही योजना जाहीर केल्या. तसेच सरकारची आर्थिक परिस्थिती बिकट बनली, त्यामुळे सरकार कर्जमाफी करणार नाही, अशीही चर्चा सुरु आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी मागच्या महीनाभरातच मोफत वीज योजना, कापूस आणि सोयाबीनसाठी हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यातच राज्य सरकारकडे पैसा नाही, हे नुकतचं अर्थमंत्री आणि इतर मंत्र्यांमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्यावरून स्पष्ट झालं. याचा आधार घेऊन सरकारच्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पण सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा चांगलाच फटका बसणार, याची जाणीव आहे. शेतीमाल बाजारभावाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर दिसतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणतीही जोखीम घेण्यास सत्ताधारी तयार दिसत नाहीत.

शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकार निवडणुकीच्या तोंडावर सर्व ते प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे १४ हजार कोटींची मोफत वीज योनजा आणि सव्वाचार हजार कोटींची कापूस, सोयाबीनला हेक्टरी ५ हजार रुपये मदतीची योजना म्हणून सरकारने जाहीर केली.

तसेच पीकविमा योजनेतूनही यंदा शेतकऱ्यांना विक्रमी भरपाई मिळाली. केवळ खरिपासाठी ७ हजार २०० कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली. कधी नव्हे तेवढे लोकप्रतिनिधी पीक विम्यावरून एवढे आक्रमक झाले. रोज आमदार आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या पीकविमा भरपाईचा मद्दा मांडत आहे.

मुख्यमंत्री आणि कृषिमंत्रीही कृषी विभागाला धारेवर धरून विमा भरपाई देण्याची तंबी देत आहेत. हे ऐकून नक्कीच आपल्या लोकप्रतिनिंचा हेवा वाटतो. पण इतर प्रश्नांवर मात्र ही तत्परता दिसून येत नाही. कारण त्याचे भांडवर निवडणुकीत करता येत नाही.

सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी मोफत वीज, कापूस-सोयाबीनला हेक्टरी ५ हजार रुपये दिले. पण शेतकरी आजही कर्जामाफीची मागणी करत आहेत. सरकारही याच दिशेने काम करत असल्याची खात्रीशीर माहीती आहे. पण कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी निवडणुकीच्या आधीच केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेतकरी कर्जमाफी

संबंधित बातम्या

चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

March 2, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

खुर्ची तीच, फक्त नाव बदलले! ग्रामंपचायतींवर सरपंचांना प्रशासक बनवून सरकारने साधली ‘राजकीय सोय’

February 22, 2026
Next Post

Big News! एससी, एसटी जातींच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल; ओबीसीप्रमाणे 'हा' निकष लागू होणार; ऐतिहासिक निर्णय

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा