टीम मंगळवेढा टाईम्स।
शेतातील विद्युत टाॅवर चा मोबदला आठ दिवसांत द्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षातील कार्यकर्त्यांनी दिला होता या वरती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी त्वरित बैठक बोलवून संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा आदेश देण्यात आला होता.
याची अंमलबजावणी करण्यात आली असुन मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर, तांडूर तामदडीं, माचणूर, ब्रह्मपुरी, उचेठाण या गावातील 59 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रहार मुळे शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो हा विश्वास निर्माण झाला आहे.
तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी जो पर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या तारेखालील जमीनीचे पंचनामे करून त्वरित त्याचे पैसे जमा करावेत तसेच दर महिन्याला त्यांना टाॅवरचा मोबदला किमान 15000 रु भाडे तत्वावर शेतकऱ्यांना मिळत नाहीत तो पर्यंत आपण शांत बसणार नाही असे सांगण्यात आले.
यावेळी प्रहारचे कार्याध्यक्ष अमोग सिद्ध काकणकी, महेश तळ्ळे , आप्पाराया काकणकी, बिळ्यानसिद्ध पाटील, कैलास पाटील, भागवत मळगे, प्रशांत पोपळकर , संतोष घोडके , बाळू जाधव तसेच इतर ही कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज