टीम मंगळवेढा टाइम्स ।
साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काटामारी रोखण्यासाठी येथे आंदोलन अंकुशने उभारलेल्या शेतकरी वजन काट्याची पाहणी मंगळवेढा येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली.
सोलापूर जिल्ह्यातही शेतकरी वजन काटा उभा करण्याचा निर्धार मंगळवेढा येथून आलेल्या शेतकरी शिष्टमंडळाने केला.
येथील आंदोलन अंकुशने उभा केलेल्या शेतकरी वजन काट्याची चर्चा सर्वदूर पोहोचली आहे.
सोलापूर जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा त्रयस्थ काटा उभारण्यासाठी मंगळवेढ्यातील वीस शेतकरी आज येथे आले होते. त्यांनी आंदोलन अंकुशच्या शेतकरी वजन काट्याची माहिती घेतली.
आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी त्यांना काट्याविषयी व या प्रयोगाच्या यशस्वितेबद्दल माहिती दिली. काटा उभारणीसाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, अशाच प्रकारचा प्रयोग येत्या हंगामात काटा उभा करणार असल्याचे या समितीचे प्रमुख संजय कट्टे यांनी जाहीर केले.
आंदोलन अंकुशचे कृष्णा देशमुख, महेश जाधव, अमोल गावडे, एकनाथ माने, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, मंगळवेढ्यातील सजग नागरी कृती समितीचे ॲड. भारत पवार, शेतकरी संघटनेचे सिद्धेशवर हैम्बडे आदी शिष्टमंडळात सहभागी होते.
अशाच प्रकारचा प्रयोग आम्ही करणार…
उसाच्या वजनातील काटामारी वरील उत्तर म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीचा वजन काट्याचा प्रयोग आंदोलन अंकुश ने यशस्वी करून दाखवल्याने याची राज्यभर चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने या काट्याची माहिती करून घेण्यासाठी मंगळवेढ्याचे शिष्टमंडळ शेतकरी वजन काट्यावर भेट देण्यासाठी आले होते.
त्यांनी याची माहिती घेऊन अशाच प्रकारचा प्रयोग आम्ही येत्या हंगामात काटा उभा करून करणार असल्याचे या समितीचे प्रमुख संजय कट्टे सर यांनी यावेळी जाहीर केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज