टीम मंगळवेढा टाईम्स । प्रख्यात उर्दू कवी, लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. इंदौरी यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
इंदुरमधील लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. खुद्द राहत इंदौरी यांनी आज सकाळी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांचे हे ट्वीट आता अखेरचे ठरले आहे.
जनाज़े पर मेरे लिख देना यारो
मुहब्बत करने वाला जा रहा है !!अलविदा राहत साहब pic.twitter.com/MCkLm6WGaX
— Imran Pratapgarhi (@ShayarImran) August 11, 2020
‘अचानक लक्षणे जाणवू लागल्यामुळे सोमवारी रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. आता त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे’ असं इंदौरी म्हणाले होते.
तसंच, ‘मी आता हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे, माझ्यासाठी नक्की प्रार्थना करा. पण एक विनंती आहे की, माझ्या घरी फोन करू नका, माझ्या तब्येतीबद्दल मी ट्वीटर आणि फेसबुकवर याची माहिती देत राहिल’ असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं होतं.
परंतु, ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन दिवस उलटला नाही तेच राहत इंदोरी यांच्या निधनाची बातमी आली. कोरोनामुळे इंदौरी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Bulati hai magar jane ka nahi, fame Rahat Indouri dies due to corona
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज