टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील लक्ष्मण हेंबाडे यांच्या पांदवाट काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उद्या रविवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता मुंबई येथील प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते
काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थित होणार आहे.
राजमाता बँकेचे चेअरमन डॉक्टर अशोक सुरवसे, धनश्री परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे, रतन चंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा,
उद्योगपती अभय हजारे, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, वाशी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद शिंदे , ग्रंथ मित्र सुरेश फडके, वाघिरे कॉलेज पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीरा देशमुख चिकने , हजरत काझी, बजरंग दत्तू ,
कवी शिवाजीराव सातपुते , शब्द सुमने मंच चेअध्यक्ष कवी हेमंतराव रत्नपारखी , कविवर्य अशोकजी उन्हाळे , कवी सुरेश वडर सी . बा . यादव प्रतिष्ठान चे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गणेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

सद्गुरु गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय डोंगरगाव व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा मंगळवेढा, हेंबाडे परिवार यांच्या वतीने हिरकणी पॅलेस हाजापूर रोड डोंगरगाव येथे कार्यक्रम रविवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी या कार्यक्रमाला मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन मसाप शाखा मंगळवेढा यांचे वतीने करण्यात आले आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









