मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
सोलापूर शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त दीपक आर्वे यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्याच नावे बनावट फेसबुक आयडी तयार करण्यात आले. श्री. आर्वे यांचा मित्र असल्याचे भासवून ऑनलाइन पद्धतीने ६० हजार रुपये उकळल्याची बाब समोर आली आहे.
सहायक पोलिस आयुक्तांच्या मित्राने ज्यावेळी फोनवरून श्री. आवें यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली.. त्याचवेळी वस्तुस्थिती समोर आली. त्यानंतर दीपक आर्वे यांनी त्यांच्या मित्राला ताबडतोब पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला.
इतर फेसबुक युजर्सनाही त्यांनी आवाहन केले. त्यांचे ते बनावट फेसबुक खाते सायबर पोलिसांच्या मदतीने बंद केले.
दरम्यान, शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त दीपक आर्वे यांना २६ जुलैला सकाळी त्यांचे पुण्यातील चंद्रशेखर या मित्राचा फोन
आला. चंद्रशेखर यांनी आर्वे यांना सांगितले, तुमच्या मित्राला २५ हजार टाकायचे आहेत का? अगोदरच ६० हजार रुपये दिले आहेत.
सगळा प्रकार समोर आल्यानंतर आर्वे यांना काय घडले असावे ते लक्षात आले. त्यांच्या नावाने कोणीतरी बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्यांच्या मित्रांकडून पैसे मागत असल्याची बाब समजली. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या फेसबुकवरून मित्रांना त्यासंबंधीची माहिती दिली.
फेसबुक नेहमी लॉक ठेवावे
नागरिकांनी फेसबुक नेहमीच लॉक ठेवावे. अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट स्वीकारू नये, तसेच कोणत्या मित्राने फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैसे मागितल्यास फोनवरून त्याच्याशी संपर्क साधून खात्री करावी, असे आवाहन दीपक आर्वे यांनी यावेळी केले
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज