टीम मंगळवेढा टाईम्स ।
बँक अकाउंट हॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर आता फेसबुकही हॅक केले जात आहे. मंगळवेढा तालुक्यात काहीजणांचे फेसबुक अकाउंट हॅक करून फेसबुक वरील मित्रांना, नातेवाईक यांना पैसे मागण्याचा प्रकार सुरू आहेत
मात्र तळसंगी येथिल शिक्षक नानासाहेब मेटकरी यांचे फेसबुक अकौंट हॅक करून त्यावर अश्लिल चित्रे, व्हिडीओ शेअर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याप्रकरणी त्यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हल्ली प्रत्येकाचा सोशल वावर वाढला आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर असणे नित्याचे झाले आहे. हा वावर वाढल्यामुळे हॅकिंगसारख्या गैरप्रकारांनाही खुले रान मिळाले आहे. फेसबुकचे अकाउंट हॅक होणे ही अनेकांना भेडसावणारी समस्या आहे.
फेसबुक, जीमेल किंवा ट्विटरचे अकाउंट हॅक झाले, तर त्याचा होणारा गैरवापर महागात पडू शकतो. फेसबुकवर अनेक फेक अकाऊंटस आहेत. व पहिल्यांदा लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते.
प्रोफाईलवर महिलेचा फोटो आणि अकाऊंट महिलेच्या नावाने असल्याने काहीजण मोहित होवून लगेच ती रिक्वेस्ट स्विकारतात. व त्यानंतर फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून वेळेअवेळी चॅटींग होते. व चॅटींगच्या नादात आपण फसले गेलेलो आहोत हे फसवणूक झाल्यानंतरच लक्षात येते.
हे प्रकार टाळायचे असतील तर फेसबुकचा वापर हा गरजे पुरताच असावा आणि मेसेंजर डाऊनलोड न केल्यास चॅटींगचा प्रश्न उदभवणार नाही पर्यायाने फसवणूक टळेल असे मत जाणकारातून व्यक्त केले जात आहे.
तक्रार दाखल केली
माझे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यावर अश्लील छायाचित्रे, व्हिडीओ अपलोड केली आहेत मला याबाबत माझ्या सहकारी मित्राकडून समजले तेव्हा मी माझे अकाउंट हॅक केलेबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे- नानासाहेब मेटकरी, शिक्षक तळसंगी
फेसबुकचा वापर करताना प्रायव्हसी सेटिंग ठेवा
फेसबुकचा वापर करताना प्रायव्हसी सेटिंग अशी ठेवा की कुणीही अनोळखी व्यक्ती तुमच्या वॉलवर पोस्ट करू शकणार नाही. किंवा तुम्ही टाकलेली पोस्ट पाहू शकणारही नाही. जर हॅकरने व्यक्तीचे फेसबुक अकाउंट किंवा ई-मेल हॅक केला असेल, तर त्याची तक्रार पोलिसांकडे अथवा सायबर क्राइमकडे देणे आवश्यक आहे.-रणजित माने , पोलीस निरीक्षक मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज