mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दामाजी कारखान्याच्या 265 एकर जमिनीवर डोळा; अँड.नंदकुमार पवारांचा हल्लाबोल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 11, 2022
in मंगळवेढा
दामाजी निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागले; अँड.नंदकुमार पवार यांनी केला ‘हा’ आरोप

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आ.समाधान आवताडे यांनी गेल्या सहा वर्षात दामाजी हडप करण्याच्या दृष्टीने कारभार केला. सभासदांना, कामगारांना हीनपणाची वागणूक दिली. त्याचा दामाजी कारखान्याच्या असणाऱ्या २६५ एकर जमिनीवर डोळा असून

या निवडणूकीत जागरूकपणे मतदान न केल्यास दामाजीचे नाव पुसून आवताडे अँड कंपनीचे नाव लागेल म्हणून अशा प्रवृत्तीचा सभासद शेतकऱ्यांनी चोख बंदोबस्त करण्याचे या निवडणुकीत ठरवले आसल्याने आ.समाधान आवताडे याच्या पॅनलचा पराभव अटळ आहे असा घणाघात माजी सभापती अँड.नंदकुमार पवार यांनी केला.

समविचारी आघाडी पॅनलच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे प्रा शिवाजीराव काळूगे हे होते.

यावेळी व्यासपीठावर दामोदर देशमुख,रामकृष्ण नागणे, शिवाजीराव काळुंगे,यादाप्पा माळी शिवानंद पाटील,अजित जगताप, पांडुरंग चौगुले,तानाजी खरात,रामचंद्र वाकडे,मुरलीधर दत्तू,

अजित जगताप, गौरीशंकर बुरुकुल,गोपाळ भगरे, नितीन नकाते, राजेंद्र पाटील, संजय पाटील, भारत पाटील,बसवराज पाटील,तानाजी काकडे,रमेश भांजे,पांडुरंग भाकरे,चंद्रशेखर कौडूभैरी,

सोमनाथ माळी,पी.बी.पाटील, भारत बेदरे , औदुंबर वाडदेकर राजेद्र पाटील,अशोक चौंडे,सुरेश कोळेकर आदीसह कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अॅड पवार म्हणाले की आम्ही दामाजीवरील सत्ता सोडताना साखर गॅस मोलॅसिस अशी जवळपास ११५ कोटी रुपयांची मालमत्ता शिल्लक होती तरीही आवताडे यांनी कारखान्यात कोणताही विकास कामे न राबवता तब्बल २०० कोटी चे कर्ज करून ठेवले आहे.

विद्यमान सत्ताधाऱ्यांनी १ लाख ३० हजार पोती परस्पर बाजारात विकली,आम्ही १४ हजार ५०० सभासद वाढवले त्यांनी मात्र १९ हजार ५०० सभासद कमी करण्याचा प्रयत्न केला तो आम्ही उधळून लावला,

तरीही त्यांनी अडीच हजार सभासद कमी केले व अडीच हजार नवीन सोयीने सभासद केले आ.आवताडे यांचा कारखान्याच्या २६५ एकर जमिनीवर डोळा आहे.

आसवानी प्रकल्प पूजनासाठी ८० लाख व कोरोना काळात किट तीन हजार किट वाटून २० हजार किट वाटल्याचे सांगून ८९ लाख हडपले असून त्यानी विकास न करता भ्रष्ट पद्धतीने कारभार केला आहे.

झेडपीचे माजी सभापती
शिवानंद पाटील म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी १९ हजार ५०० सभासदाला आपत्र करण्याचा डाव रचला होता. मात्र तो फसला आहे . सर्वसामान्य सभासद शेतकरी हा कारखान्याचा मालक असून आम्ही सत्तेत आल्याबरोबर सर्वांना सभासद खुले करणार आहोत.

२८ हजार सभासद हेच कारखान्याचे मालक राहतील. कारखाना वाचवण्यासाठी ही शेवटची संधी असून सभासदानी जागरूकपणे मतदान करून समविचारी पॅनलला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप म्हणाले की आ आवताडे यांनी कर्जाचा डोंगर उभा केला असताना त्यांचे काही बगलबच्चे कर्ज फेडल्याबाबत बाता मारत आहेत.

आ.आवताडेच्या राजकीय शाळेत केवळ लबाडीचे ट्रेनिंग दिले जात आहे असे म्हणाले.

बळीराजा पतसंस्थेचे अध्यक्ष दामोदर देशमुख म्हणाले की सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या कोणते आश्वासनाची पूर्ती केली नाही कारखाना कर्जमुक्त करू म्हणणाऱ्यानी कारखान्यावर कोट्यावधी रुपयाचे कर्ज केले. सत्ताबदल झाल्यास समविचारी गटाच्या माध्यमातून कारखान्यासाठी १४ कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी दिले

प्रा शिवाजीराव काळूगे म्हणाले, कर्जमुक्त आसलेला दामाजी कारखाना २० कारखान्याएवढा उद्योग असणाऱ्या आ समाधान आवताडे यांनी कर्जबाजारी करून ठेवला.

२८ हजार सभासदाच्या मालकीची सहकारी संस्था अबाधित राहावी यासाठी पक्षीय मतभेद विसरून समविचारी आघाडी करून निवडणूक लढविली जात आहे. सभासदांनी मोठ्या अपेक्षेने सत्ता दिली मात्र आ आवताडे यांना संधीचे सोने करता आले नाही त्यामुळे कारखान्याची अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

पैशाच्या जीवावर निवडणूका जिंकता येतात हे खुळ आ समाधान आवताडे यांच्या डोक्यात आहे ते खूळ कायमचे काढून टाकण्यासाठी स्वाभिमानी मतदारांनी आ आवताडे पॅनलचा विक्रमी मतांनी पराभव करून धडा शिकवावा असे आवाहन पैलवान अशोक चौंडे यांनी केले.

आ आवताडे यांनी कारखान्यात साखर
उतारा जाणीवपूर्वक कमी दाखवल्याने बेहिशोबी साखरेतुन कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. एवढी हेराफेरी करूनही सभासदांची दिशाभूल करून सत्ता मिळविण्याचा त्यांचा डाव आहे.

मात्र, अशा सहकारद्वेषी लोकांचा सभासदानी सहा वर्षे कारभार पहिला असून पुन्हा त्यांच्या हाती कारखान्याची सूत्रे गेल्यास कारखाना व ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागतील. म्हणून अशा प्रवृत्तींचा सभासद शेतकऱ्यानी बंदोबस्त करावा, असे आवाहन अजित जगताप यांनी केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नंदकुमार पवार

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकरांनो! गॅसची ‘ई-केवायसी’ त्वरित करा, अन्यथा सबसिडी होईल बंद; ​शांतीसागर इंडेन गॅस कंपनीने नागरिकांना केले आवाहन

February 25, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन; आमदार आवताडेंचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार

February 22, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
Next Post
छावणी घोटाळ्यात विरोधाकातील काही संचालक आज जेल मध्ये दिसले असते; समविचारीवर आ.आवताडेंनी डागली तोफ

नीट समजून घ्या! १९ हजार सभासद अपात्र असल्याचे विरोधकांकडून खोटे भांडवल; कोणी राजकीय उचली घेऊन बाजारात दुकान थाटली; आ.आवताडेंचा घणाघात

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा