टीम मंगळवेढा टाईम्स।
माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओळखी असून मी पोलीस पाटील आहे. तुम्ही कंपनीत पैसे गुंतविलास तर आकर्षक परतावा दिला जाईल, असे सांगून ११ लाख ४० हजार रुपयांची भाजीपाला विक्रेत्या महिलेसह अन्य तिघांची फसवणूक केली.
याबाबत अमोल बचन नलवडे, त्यांची पत्नी संध्या अमोल नलवडे (रा. पाचेगांव खुर्द, सध्या रा. शिवाजीनगर, सांगोला) व शुभ ट्रेडबिझ इंडिया एल.एल. पी. या कंपनीचे संचालक अभिजीत धोंडीबा सावंत (रा.कोल्हापूर, मूळ गाव मंगळवेढा तालुक्यातील असल्याची चर्चा) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भाजीपाला विक्रेत्या लक्ष्मी सदाशिव नायकुडे (रा. बनकर वस्ती, सांगोला) यांना त्यांचे नातेवाईक रामचंद्र तुकाराम सरगर (सांगोला) यांनी २९ डिसेंबर २० रोजी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो, असे सांगून
त्यांच्या ओळखीचे अमोल बचन नलवडे व त्यांची पत्नी संध्या अमेल नलावडे यांनी असे मिळून त्यांच्या घरी आले व तुम्हाला चांगला नफा कमवून देतो, शेअर मार्केटचे ट्रेनिंग सुद्धा देतो असे सांगितले.
त्यांची पत्नी संध्या नलवडे यांनी मी पोलीस पाटील असून तुम्ही कसलीही काळजी करू नका माझ्या वरिष्ठ अधिकारी वर्गाबरोबर ओळखी असल्याने तुम्हाला अडचण येऊ देणार नाही,
असे सांगून आमच्या कंपनीमध्ये शेअर मार्केट बाबत शिकवण्याचा कोर्स असून त्याद्वारे आम्ही तुम्हाला शेअर मार्केटचे प्रशिक्षण देऊन पुढे जाऊन इन्व्हेस्टमेंट केल्यास ६ टक्के महिन्याला देणार असे सांगितले. त्यावेळी त्यांनी त्यांना भरपूर लोकांनी माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट केली आहे.
त्यांना सुद्धा आपण चांगले रिटर्न दिले असाल्याचा विश्वास दिला. त्यांच्यावर विश्वास ठेवून सुमारे १ लाख १० हजार रुपये नलवडे यांच्या हातात दिले. यावर त्यांनी सदर पैसे एलएलपी वा कंपनीमध्ये गुंतवल्याबाबतचे त्यांच्या नावे १ लाखाचे सर्टिफिकेट देवून इतर रकमेचे सर्टिफिकेट नंतर देतो म्हणून अद्याप पर्यंत दिलेली नाहीत.
त्यानंतर लक्ष्मी नायकुडे यांनी गुंतवलेल्या रक्कमेवर संबंधित कंपनीच्या बँक खात्यावरून ६ टक्क्यांनी परतावा दोन महिने मिळाला व त्यामधून चार्ज व टीडीएस चार्जेस कट करून आमच्या खात्यावर पैसे जमा व्हायचे.
त्यानंतर दोन महिने होऊन सुद्धा त्यांच्या खात्यावर वरील प्रमाणे परतावा जमा होत नसल्याने त्यांनी अमोल नलवडे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी संबंधित कंपनीचे डायरेक्टर अभिजीत सावंत (रा.कोल्हापूर) यांचेवर गुन्हा दाखल झाला आहे.
ते जून महिन्यापर्यंत बाहेर आल्यावर तुमचे पैसे देतील, असे सांगितले. त्यानंतर वारंवार पैशाची मागणी करून सुद्धा वेळोवेळी अमोल नलवडे यांनी टाळाटाळ केली.
लक्ष्मी नायकुडे यांनी यांच्याप्रमाणेच रामचंद्र सरगर यांना १ लाख ३० हजार रुपये, प्रकाश सावळा म्हमाणे यांना ६ लाख १० हजार रुपये, प्रकाश विठ्ठल गायकवाड यांना २ लाख १० हजार रुपये असे एकूण ११ लाख ४० हजार रुपयांची नलवडे पती-पत्नीने व संबंधित कंपनीचे संचालक अभिजीत धोंडीबा सावंत यांनी फसवणूक केली असल्याची फिर्याद दाखल केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज