टीम मंगळवेढा टाईम्स
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3 ऐवजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने गेले अनेक वर्षे ग्रामपंचायती निवडणुका लांबणीवर टाकल्यामुळे अनेक इच्छुकांना मतदारांची मन धरणी करताना नाकीनव येवू लागले. ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या पाच दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी कमी असून सदरचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे अनेक इच्छुकांची पहिल्या दिवशी निराशा झाली. सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी तोच ठेवत सकाळी ११ ते ३ हा पूर्वीचा कालावधी निश्चित केला होता. हा कालावधी २.३० तासाने वाढवून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत निश्चित केला.
तशी अधिसूचना के. सूर्यकृष्णमूर्ती उपसचिव राज्य निवडणूक आयोग यांनी प्रसिद्ध केली. दरम्यान, आज मंगळवेढ्यात २७ ग्रामपंचायतीमध्ये अकोला या ग्रामपंचायतीसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याचे माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाने याची दखल घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी २.३० तासाने वाढवला. मंगळवेढ्यात आज दुसऱ्या दिवशी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला.
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, नंदूर, लक्ष्मी दहिवडी, खुपसंगी, रड्डे, खडकी, बठाण, मुंढेवाडी, हिवरगाव, महमदाबाद हु, अकोला, शेलेवाडी, डिकसळ, जालीहाळ, लोणार, मानेवाडी, शिरसी, जंगलगी, रेवेवाडी, पडोळकरवाडी, देगाव, उचेठाण, निंबोणी, चिक्कलगी, जुनोनी, ब्रम्हपुरी,भाळवणी, तर बालाजी नगर या एकमेव ग्रामपंचायतची पोटनिवडणूक होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज