टीम मंगळवेढा टाइम्स ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी बुधवारपर्यंत दि.१७ मुदतवाढ देण्यात आली आहे. ही अंतिम मुदतवाढ असणार आहे, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्काने २० डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याची मुदत निश्चित केली होती,
परंतु काही विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज भरायचे राहून गेल्याचे निदर्शनास आले. नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी
मंडळाकडे केली होती. त्यामुळे ही अंतिम मुदतवाढ दिल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी जाहीर केले आहे.
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळांना भेट द्यावी
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दहावीकरिता http://form17.mh-ssc.ac.in आणि बारावीकरिता http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात येणार आहे.
तसेच, पात्र विद्यार्थ्यांनी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर परीक्षेचा अर्ज मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज