टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढयातील विविध पक्षी व प्राण्यांचे छायाचित्र प्रदर्शन आज दि.१३ ते १७ एप्रिल २०२२ रोजी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभागृह, शिशू विहारजवळ, मंगळवेढा येथे होणार असल्याची माहिती या प्रदर्शनाचे संयोजक राजू रायबान यांनी दिली.
सदर प्रदर्शनाचे उदघाटन आ.समाधान आवताडे यांच्या हस्ते होत असून यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,
सभापती प्रेरणा मासाळ, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंगळवेढयाची भौगोलिक परिस्थिती पाहता इथे असणारी तळी, पठारी भाग व छोटी जंगले यामध्ये मुबलक प्रमाणात वन्यजीव विविधता आढळते.
यामध्ये हरीण, लांडगा, कोल्हा, खोकड, इ.प्राण्यांसोबत विविध प्रकारचे रंगाचे पक्षीही पहायला मिळतात.
मंगळवेढयातील ही वन्यजीव विविधता विदयार्थी, शिक्षक, पालक व इतरांनाही सहकुटूंब पहाता यावी यासाठी मंगळवेढयात प्रथमच भरत असलेले
मंगळवेढयातील विविध पक्षी व प्राण्यांचे छायाचित्र प्रदर्शन सहकुटुंब पाहण्याची संधी मंगळवेढेकरांना यानिमित्ताने उपलब्ध झालेली आहे. हे प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत खुले राहणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज