टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२४ सप्टेंबर रोजी दुपारी ठिक १ वाजता कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली.
सदरहु सभेमध्ये सभासदांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून ती क्षमापित करणे, मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा संस्थेच्या कामकाजाविषयी अहवाल स्विकारणे, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके स्विकारणे,
त्यास मान्यता देणे, वैधानिक लेखापरिक्षक यांचेकडून आलेला लेखा परिक्षण अहवाल वाचून नोंद घेणे, मागील आर्थिक वर्ष २०२१-२२ चा संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्विकारणे व त्यास मान्यता देणे,
अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या जमाखर्चास मंजूरी देणे, पुढील वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, पुढील आर्थिक वर्षाकरिता वैद्यानिक लेखापरिक्षक व आवश्यकतेनुसार इतर सल्लागारांच्या नेमणूका करणे
तसेच अध्यक्ष यांचे पूर्व परवानगीने सभासदांनी विचारलेले प्रश्न व धोरणात्मक सुचना इत्यादी विषयांवर या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विचार-विनीमय होणार असलेचे प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी सांगीतले.
आपल्या सभासदांच्या मालकीच्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या दि.२४/९/२०२३ रोजी संपन्न होणा-या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील व व्हा.चेअरमन तानाजी खरात यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज