टीम मंगळवेढा टाईम्स ।
संत दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी दुपारी आप्पाश्री लॉन्समध्ये तालुक्यातील समविचारी नेते, पदाधिकारी , कार्यकर्ते व सभासदांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत सुकाणू समिती स्थापन करण्यात आली. शहा सत्ताधारी संचालक मंडळाच्या विरोधात एकास एक पॅनल करण्याचे ठरले.
यासंदर्भात राहुल (चेअरमन , रतनचंद शहा अर्बन बँक), भगीरथदादा भालके , ( चेअरमन, श्री विठ्ठल सह.साखर कारखाना), बबनराव आवताडे , (संचालक,डीसीसी बँक), प्रा.शिवाजीराव काळुंगे (संस्थापक,धनश्री परिवार),
दामोदर देशमुख (संस्थापक चेअरमन , बळीराजा पतसंस्था), राहुल घुले (अध्यक्ष,प.म.युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना) , प्रा.पी.बी.पाटील (अध्यक्ष , तालुका राष्ट्रवादी काँग्रेस),
तुकाराम कुदळे (अध्यक्ष , तालुका शिवसेना) ॲड. नंदकुमार पवार ( अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी ) यांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे.
‘दामाजी’साठी पहिल्याच दिवशी ४० अर्जांची विक्री
मंगळवेढा दामाजी सहकारी साखर : कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीस अर्ज भरण्यास काल शुक्रवारी प्रारंभ झाला.
पहिल्याच दिवशी ४० उमेदवारी अर्जाची विक्री झाली, मात्र शुक्रवारी एकही अर्ज दाखल झाला नाही.
दामाजी कारखाना निवडणुकीसाठी ९ जून २०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
पहिल्याच दिवशी ४० अर्जांची विक्री झाल्याने मुदतीत किती अर्ज दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकूणच कारखान्याची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची संख्या असल्याने नेतृत्वासमोर जास्त उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न राहणार आहे. उमेदवार मात्र कागदपत्रांची जुळवाजुळव करीत असल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही गटांकडून सभासदांशी विचार विनिमय करण्यासाठी बैठकांवर जोर देत आहेत . शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे.
आज शनिवारी , रविवारी शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे सोमवार ते गुरुवार असे मोजकेच चार दिवस अर्ज भरण्याचे दिवस आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज