टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या मंगळवेढा शहरातील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे 67 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले.शिक्षण क्षेत्रात असलेला इंग्लिश स्कूलच्या दबदबा जिल्ह्यात कायम राहिला.
आठवी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये 44 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यामध्ये माधवी बिले (सातवी), ऋतुजा जोध (सातवी), प्रज्ञा शिलेदार (सातवी), समृद्धी आवताडे (पंधरावी), मकरंद ढेपे (पंधरावा) हे पाच विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले.
तर 44 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यांना शिक्षक सतीश सावंत (गणित), विशाल माने (बुद्धिमत्ता), शिवाजी भोसले (इंग्रजी), नर्गिस इनामदार (मराठी) या विषयावर मार्गदर्शन लाभले
पाचवीचे 23 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यामध्ये आदित्य काशीद जिल्ह्यात दहावा, समर्थ मासाळ जिल्ह्यात अठरावा व सई जगताप हीने जिल्ह्यात 28 वा क्रमांक मिळवत बाजी मारली.
त्यांना शिक्षक वाल्मीक मसाळ (गणित), तुकाराम हजारे (बुद्धिमत्ता), संध्या राक्षे (इंग्रजी), कल्पना जोशी (मराठी) यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुजित कदम, संचालक डॉ.सुभाष कदम, डॉ. मीनाक्षी कदम, सचिव प्रियदर्शनी महाडिक, प्राचार्य शिवाजी चव्हाण, उपप्राचार्य तेजस्विनी कदम यांनी अभिनंदन केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज