मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
विधानसभा निवडणूक काळात नेमलेल्या कामात कसूर केली म्हणून नगर परिषद प्राथमिक, शिक्षण मंडळ मंगळवेढा प्रशासन अधिकारी अर्चना जनबंधू व उपशिक्षक संजय चेळेकर यांच्या विरोधात निवडणूक नायब तहसीलदार जयश्री स्वामी यांनी फिर्याद दाखल के ली आहे. ही घटना नोव्हेंबर २०२४ मध्ये घडली आहे. बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार मदन जाधव यांनी दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी उपशिक्षक संजय चेळेकर यांची पंढरपूर मतदार संघातील मतदार केंद्र क्रमांक १९७ साठी मतदान केंद्रीय स्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. परंतु त्यांनी ड्युटी नाकारली.
त्याबाबत नगरपरिषद शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी अर्चना जनबंधू यांनी तहसील कार्यालयास त्यांच्याकडील जावक क्र. नशिमं/निवडणूक/२०२४ २०२५/१४५ दि. २५ सप्टेंबर २०२५ अन्वये नगरपरिषद प्राथमिक शिक्षण मंडळ मंगळवेढा अधिपत्याखाली चेळेकर यांनी मतदार यादी प्रसिध्द करण्यास संदर्भीय पत्रान्वये नकार दिला, असे नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयास कळवले.
त्यानंतर सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार मदन जाधव यांनी जनबंधू यांना ४ ऑक्टोबर २०२४ व ५ नोव्हेंबर २०२४ रोजी लेखी पत्र देऊन उपशिक्षक चेळेकर यांची विभागीय चौकशीची कार्यवाही
तसेच फौजदारी कार्यवाही करण्यासाठी प्राधीकृत केले होते. परंतु शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी त्यांची विभागीय चौकशी केली नाही. म्हणून तहसीलदार जाधव यांनी गुन्हा दाखल करण्यास सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज