टीम मंगळवेढा टाईम्स।
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारचं बहुमत कमी झालं आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून या सत्तासंघर्षात एंट्री केली आहे.
फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी आपण उद्याच मुंबईत येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्या राज्यपाल हे फ्लोअर टेस्टची मागणी करू शकतात
देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंगळवारी भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपने महाविकासआघाडी सरकार अल्पमतात असून लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर राज्यपालांनी हे पत्र लिहलं आहे.
राज्यपालांच्या या पत्रानंतर आता उद्धव ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर हे काल राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी बहूमताची चाचणीची मागणी केली होती.
या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बहुमत चाचणीची घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्याच महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आम्ही उद्या मुंबईत जाणार आहोत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये दिली आहे. शिंदे यांनी बुधवारी सकाळी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली आहे(स्रोत:साम TV)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज