मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
युवक वर्ग झटपट श्रीमंत होण्यासाठी अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या व्यवसायांच्या नादी लागला आहे. यातून पंढरपूर तालुका व शहर परिसरात अनुचित प्रकार घडत असतात.

अशा युवकांवर वचक बसावी, यासाठी आठ वाळूमाफियांना एक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई तालुका पोलिसांनी केली आहे.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्याचे आदेश २८ ऑगस्टला निर्गमित केले आहेत.


आठ वाळूमाफियांना महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ प्रमाणे सोलापूर शहर सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेले आहे.

पंढरपूर तालुक्यातील त्या आठ वाळू माफियांविरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्याला मारामारीचे वाळू चोरीचे, सरकारी कामात अडथळा आणल्याचे, तसेच धमकी दिल्याचे गुन्हे दाखल आहेत.

त्या अनुषंगाने वरील त्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांची सोलापूर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांत तेथील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यामध्ये सोडून तडीपारीची अंमलबजावणी पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहा. पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, भारत भोसले, दत्तात्रय तोंडले, सहा उपनिरीक्षक विजय गायकवाड, आबा शेंडगे, घंटे, सय्यद, सागर गवळी, मंगेश रोकडे, बालाजी कदम, हसन नदाफ, घाडगे, चाटे यांनी केली आहे.

हद्दपार टोळीतील वाळू माफिया
पंकज पांडुरंग कोळेकर (वय ३३), हिंमत अनिल कोळेकर (३०), विनोद अर्जुन कोळेकर (३५), संतोष दगडू चव्हाण (४६, वरील सर्व, रा. कोळेकर वस्ती गुरसाळे, ता. पंढरपूर), आकाश ऊर्फ अक्षय भगवान घाडगे (२८, रा. देगाव, ता. पंढरपूर), धनाजी रामचंद्र शिरतोडे (३४, रा. गुरसाळे, ता. पंढरपूर), महेश दिगंबर शिंदे (२८, रा. सहयाद्री नगर, इसबावी, ता. पंढरपूर), सोमनाथ अरुण लोंढे (३४, रा. कौठाळी, ता. पंढरपूर)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













