टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिकेच्या वतिने कोरोना विषेश लसिकरण अभियान तसेच बांधकाम कामगार व इतर असंघटित कामगारांना ई श्रम कार्ड अभियान मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ, वडर गल्ली येथील समाज मंदिरात आज दि.२५ जानेवारी रोजी
सकाळी १० ते २ वाजेपर्यंत असणार आहे. अशी माहिती मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे सचिव आदित्य मुदगुल ( हिंदुस्तानी) यांनी दिली.
केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी ‘ई-श्रम कार्ड’ सुरू केले आहे. त्यासाठी ई-श्रम पोर्टलदेखील बनवले. मात्र, कामगार कार्यालयामध्ये नोंद नसलेल्या कामगारांना पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अनभिज्ञ आहेत. यासाठी आज आदित्य मुदगुल यांनी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.
सध्या केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने कामगार विभागाला ई-श्रम पोर्टलवर श्रमिकांच्या नोंदणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
तसेच या नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही पण यातील बहुसंख्य अशिक्षित व अडाणी असल्यामुळे अनेक कामगारांना नोंदणी करण्याविषयी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे आतापर्यंत किती कामगारांची नोंदणी झाली आहे, याची अधिकृत माहिती नाही.
नोंदणीसाठी असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे वय १६ ते ५९ वर्ष या दरम्यानचे कामगार पात्र असून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसलेले कामगार नोंदणी करू शकतात.
यात स्थलांतरित, कचरावेचक, शेतमजूर, फळे-भाजीपाला विक्रेते, प्रवासी मजूर, वीटभट्टी मजूर, मच्छीमार, मीठ श्रमिक, टेनरी वर्कर्स, बांधकाम मजूर, चामडे उद्योग मजूर, नाभिक, वृत्तपत्र विक्रेता, रिक्षा चालक, घरकाम करणारे, फेरीवाला, हॉटेल, भंगार,
अंगावर काम घेणारे, सुतार, पेंटर, मातीकाम, घरकामगार, ऊसतोड, कुंभारकाम, लॉन्ड्री, चपाती सेंटर कामगार, कापूस पिंजारी अशा शासनाने निश्चित केलेल्या ३०० उद्योगातील हे असंघटित कामगार असणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी आधारकार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल नंबर आवश्यक आहे. परंतु या कामगारांना नोंदणी करण्याचे माहीत नसल्यामुळे त्यांची नोंदणी होण्यास अडचणी येत आहेत. त्यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज