टीम मंगळवेढा टाईम्स ।
तिथीचा क्षय आला की, नवरात्रीतील दिवस कमी जास्त होत असतात. मात्र यंदा कोणत्याही प्रकारचा क्षय नसल्यामुळे दहाव्या दिवशी दसरा साजरा होणार असल्याचे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
यावर्षी आज दि.२६ सप्टेंबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे. आज सोमवारी पहाटे ५ पासून दुपारी १.४५ पर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करता येईल.
दि.३० रोजी ललिता पंचमी असून २ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), दि.३ रोजी महाष्टमीचा उपवास दि.४ ऑक्टोबर रोजी मंगळवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती),
दि.५ ऑक्टोबर रोजी बुधवारी दसरा आहे. अशीचामुळे किंवा इतर काही अडचणीमुळे ज्यांना दि.२६ सप्टेंबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही.
त्यांनी अशौच संपल्यावर दि.२८, दि.३० सप्टेंबर, दि.२ किंवा दि.३ ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व ४ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे.
महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी दि.२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते. त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे.
मात्र दुर्गाष्टमी दि.३ ऑक्टोबर रोजी आहे. विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे दि.५ ऑक्टोबर रोजी असून, साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.२६ ते ३.३१ या दरम्यान असल्याचे दाते यांनी सांगितले.(स्रोत:पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज