टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळीत तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणार्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे.
चालू पावसाळी हंगामाच्या सुरुवातीच्या सात दिवसांत उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या धरण साखळी क्षेत्रात 1348 मि.मी., तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सद्यस्थितीला उजनी धरणाची टक्केवारी तब्बल उणे 22 टक्क्यांपर्यंत गेली होती. पाणी पातळीत वाढ होऊन ती आता 19 टक्क्यांवर आली आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी 489.370 मीटर, एकूण पाणीसाठा 1499.53 द.ल.घ.मी., तर मृतसाठा उणे 303.28 द.ल.घ.मी. एवढा नोंदविण्यात आला आहे.
मृतसाठा असणार्या 64 टीएमसी पाण्यापैकी तब्बल 12 टीएमसी पाणी वापरात आले आहे. यातील केवळ 52.95 टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यात गाळाचे प्रमाण 25 टीएमसी असून केवळ पाणी म्हणून 25 ते 27 टीएमसी पाणी उजनीत शिल्लक आहे.
उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांत 1347 मि.मी. पावसाची नोंद झाली असून यामुळे उजनी धरणात यंदा लवकरच पाणीसाठा वाढण्याची आशा
निर्माण झाली आहे.
पावसामुळे हवेतील उष्णता कमी होऊन आर्द्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण 7.50 मि.मी.वरून ते 0.81 मि.मी.वर खाली आले आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सुरुवात केली असून उजनी धरणाच्या वरील बाजूस असणार्या 18 धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही थोडीफार वाढ झाली आहे.
उजनीच्या वरील बाजूस असणार्या धरणांपैकी जवळपास पाच धरणे अधिक 50 टक्क्याच्या पुढे आहेत. त्यामुळे पावसाचा सांगितलेला अंदाज आणि या धरणाची स्थिती याचा विचार केला असता या पुढीलकाळात पूरस्थिती लवकरच ओढावण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन दिवसांत उजनी धरणात 8.44 दशलक्ष घनमीटर पाणी वाढले आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज