टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाविकास आघाडी सरकारच्या गुणांमुळे केंद्र सरकारला एक दिवस महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे भाकीत खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी सोमवारी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना केले.
महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांबाबत भाजपची रणनीती ठरविण्यासाठी आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांची सोलापुरात बैठक आयोजित केली होती.
या बैठकीनंतर खासदार नाईक – निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तीन वेगवेगळ्या पक्षांचे बनलेले महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे आघाडीतील नेत्यांची मने कधी जुळलीच नाहीत.
राजकीय उलथापालथी व वाढत चाललेल्या अत्याचारांच्या घटना पाहता एक दिवस केंद्र सरकारला महाराष्ट्रात हस्तक्षेप करावा लागेल, अशी वेळ येणार असल्याचे त्यांनी भाकीत केले.
आसरा चौकातील उड्डाणपूल , बाह्यवळणाचे कामव रेल्वेल्या अडलेल्या कामांबाबत विचारले असता खासदार नाईक – निंबाळकर म्हणाले , मला सोलापुरातील प्रश्न माहीत नाहीत.
पण दि.७ ऑक्टोबर रोजी राज्यातील खासदारांची रेल्वेमंत्र्यांबरोबर बैठक आहे. या बैठकीत सोलापूरचे सर्व प्रश्न घेण्यास सांगितले आहे. त्याबाबत जरूर विचार करू असेते म्हणाले.
पत्रकार परिषदेला आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आमदार लक्ष्मण ढोबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर
जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर स्थानिक आघाड्यांना बरोबर घेऊन समझोता केला जाईल. लढणार असल्याचे खासदार नाईक – निंबाळकर यांनी सांगितले.
कोरोना महामारीचे कारण पुढे करून सरकारने कामे थांबविली कार्यालयाकडे आता पाठपुरावा सुरू केला जाणार आहे.त्यामुळे लोकांची कामे होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.(स्रोत: लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज