दुबई । तानाजी गोरड
स्वप्नांचं शहर म्हणून जगात नावलौकीक मिळवलेल्या दुबईने जगभरासमोरील सर्वात मोठ्या आव्हान असलेल्या कोरोणावर नियंत्रण मिळवण्यासाठी शुक्रवारी रात्री ८ नंतर कुणीही घराबाहेर न पडण्याचे परिपत्रकासह अॅलर्ट जारी केला.रात्री ८ नंतर दुबईने प्रशासनाने संपुर्ण शहर व परिसर निर्जंतुकीकरण करण्यास सुरवात केली.
मात्र दुबई शहराचे क्षेत्रफळ पहाता दोन दिवसात शक्य होईल असं कुणालाही वाटणार नाही. नागरिकांना दिलेल्या वेळेत शहराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दुबई ने ड्रोन मदत घेतली.रात्री इमारतीच्या खिडक्यांमधून बाहेर पहातानां नागरिकांना अनेक ड्रोन सॅनिटाइजर चा मारा करताना दिसले.
तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकणारी दुबई आपत्ती व्यवस्थापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करत असल्याचे पहायला मिळाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज