मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा चे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांचा वाढदिवस सोमवार दिनांक १० जुलै रोजी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे उपाध्यक्ष डॉ सुभाष कदम, अध्यक्ष अॅड. सुजित कदम, संस्थेच्या एडमिनिस्ट्रेटर डॉ.मीनाक्षी कदम ,सचिवा प्रियदर्शनी महाडिक संचालिका तेजस्विनी कदम,संपादक दिगंबर भगरे,
संचालक यतिराज वाकळे,प्राचार्य रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे पर्यवेक्षक राजू काझी,दिलीप चंदनशिवे,सुहास माने, माझी प्राचार्य येताळा भगत,सूर संगम ग्रुपचे लहू ढगे,नृत्यांगणा मैथीली पाटील आदजण उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दलित मित्र स्व. कदम गुरुजी यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवशंभो महिला प्रतिष्ठानच्या महिलांनी डॉ. सुभाष कदम यांचे आरती ओवाळून औक्षण केले.
यावेळी शिवतेज प्राथमिक शाळा मंगळवेढाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.यासाठी सारिका चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. ९ वी तील मुलींनी ढोल ताशाच्या गजरात कार्यक्रमास रंगत आणली
यासाठी सहशिक्षिका आलिया कादरी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी विविध रेकॉर्डर नृत्य सादर केली. यासाठी विद्यार्थ्यांना संध्या राक्षे, कल्पना जोशी, सुजाता आडसुळ, दिपाली सिरसटकर आदींनी मार्गदर्शन केले.
डॉ.सुभाष कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशंभो महिला पतसंस्थेच्या वतीने शंभर विद्यार्थ्यांना कंपास पेटी साहित्य वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना वह्या, गणवेश, शाळेची बॅग आदी साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य जयराम अलदर प्राचार्य कल्याण भोसले प्राचार्य रमेश पवार मुख्याध्यापक अजित शिंदे मुख्याध्यापक सुभाष बाबर उपमुख्याध्यापक सुनील खंदारे पर्यवेक्षक महादेव कोरे पठाण शिवशरण
तसेच शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संस्थेच्या सर्व शाखातील सर्व शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचालन बालाजी शिंदे व स्वाती दिवसे यांनी केले तर आभार आश्पाक काझी यांनी मानले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज