मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सध्या आपण २१ व्या शतकात जगत आहोत. या शतकात तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झाले आहे. पूर्वी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संदेश देण्यासाठी पत्रव्यवहार केला जायचा. मात्र आता आपण एका क्लिकवर एखाद्याला सहज मेसेज करता येतो.
विशेष त्या व्यक्तीचाही आपल्याला पुढच्या मिनिटाला रिप्लाय येतो. मात्र आता तुम्हाला मेसेज करताना सावधानता बाळगावी लागणार आहे.
जर तुम्ही एखाद्या अनोळखी महिलेला तू मला आवडतेस, असा मेसेज केला, तर तुम्हाला कोर्टाकडून थेट शिक्षा होऊ शकते.
नुकतंच महाराष्ट्रातील दिंडोशीमध्ये एका घटनेप्रकरणी कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अनोळखी महिलेला तू खूप सुंदर दिसतेस असा मेसेज पाठवणे म्हणजे विनयभंगच, असे निर्देश दिंडोशी सत्र न्यायालयाने दिले आहे.
नेमकं प्रकरण काय?
कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला एक पुरुष सतत व्हॉट्सअॅप मेसेज करायचा. रात्री ११ ते १२.३० दरम्यान तो विविध फोटो आणि मेसेज करत असायचा. “तू सडपातळ आहे, खूप हुशार आहेस, दिसायलाही गोरी आहे.
मी ४० वर्षांचा आहे, तुझे लग्न झालं आहे का?” असे मेसेज तो व्यक्ती सतत त्या महिलेला करायचा. “अनेकदा त्याने मला तू आवडतेस”, असेही मेसेज केले आहेत. याप्रकरणी त्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.
याप्रकरणी कोर्टाने २०२२ रोजी आरोपीला दोषी ठरवले होते. त्याला तीन महिने जेलमध्ये राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर त्याने दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली. आज दिंडोशी सत्र न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी करण्यात आली.
यावेळी त्या आरोपीने कोर्टात बाजू मांडली. राजकीय वैमनस्यामुळे मला या प्रकरणात अडकवलं जात आहे, असे आरोपीने म्हटले. मात्र, न्यायालयाने आरोपीचा युक्तीवाद फेटाळून लावत तुझ्याकडे असलेला एकही पुरावा सिद्ध होत नाही, असे सांगितले.
कोर्टाने काय म्हटलं?
यावेळी दिंडोशी सत्र न्यायालयाने त्यांचे निरीक्षण नोंदवले. “कोणतीही महिला अशाप्रकारे आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवून स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावणार नाही. अनोळखी महिलेला तू सडपातळ आहे, खूप हुशार आहेस, दिसायलाही गोरी आहेस, मला तू आवडतेस, असे मेसेज करणे म्हणजे विनयभंगच आहे.
हे मेसेज महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतात. कोणताही विवाहित पुरुष किंवा महिला अशा प्रकारचे व्हॉट्सॲप मेसेज आणि अश्लील फोटो सहन करणार नाही.
विशेषतः जेव्हा मेसेज पाठवणारा आणि तक्रारदार एकमेकांना ओळखत नाहीत. हे मेसेज आणि कृत्य महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे”, अशा शब्दात याप्रकरणी कोर्टाने फटकारलं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज