मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होत आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी काल tv9 मराठीशी बोलत असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलं आहे.
मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा, आपल्या हाल- अपेष्टा डोळ्यासमोर ठेवा. वेळेवर भावनिक होऊ नका. हा माझा नेता हा माझा नेत्याचा मुलगा आणि त्याला मतदान करावंच लागेल,
असं न करता तुमचे कष्ट डोळ्यासमोर समोर ठेवा. तुम्ही विचार नाही केला तर कधी मोठे होणार आहात. विचारपूर्वक मतदान करा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
श्रीमंत मराठे, नौकरी करणारे मराठे, उद्योजक, अनेक लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी आपल्या मुलांना विचारा.
मी कोणालाही पाठिंबा दिला नाही आणि माझी कुठेही टीम पाठवली नाही. मी महाराष्ट्रमधील कोणत्याही मतदार संघातील, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, मी कोणालाही पाठिंबा दिला नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मराठ्यांनी एकजुटीने 100 टक्के मतदान करा. पण ज्याने आरक्षणाला ज्यांनी विरोध केला आहे. त्यांना सोडू नका. राजकारणापेक्षा मला आरक्षण महत्वाचे आहे, आणि ते मी मिळवून देणार आहे. मराठ्यांनी संभ्रम ठेवू नये.
मी कोणालाही काही सांगितले नाही आणि शेवटपर्यंत सांगणार नाही. कोणाचेही सरकार आले तर आपल्याला लढावेच लागणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.(स्रोत:tv9मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज