टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा आणि बारामती यांच्यातल्या पाणी वाटपाचा वाद पिढ्याने पिढ्या चालला असला तरी आता बारामतीचे आता उजनीचे पाणी बारामतीला वळवणे कायमचे बंद होणार आहे हा निर्णय लवकरच होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती भाजपचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा सर्वाधिक भ्रष्ट नेत्यांपैकी पाच भ्रष्ट नेत्यांच्या फायली तयार असल्याचा खळबळ जनक गौप्यस्फोट देखील केला आहे.
राष्ट्रवादीचे बडे नेते तुरुंगात जाणार असल्याचे स्वतःच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यानंतर भाजपचा मुंबईतील नेत्या मोहित कंबोज यांनी केले होते त्यानंतर आता माढाचे भाजपचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध शड्डू ठोकून राजकीय मैदानात उतरले आहेत. टेंभुर्णी ते बोलत होते
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 10 बड्या भ्रष्ट नेत्यांची प्रकारणे ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांना देणार असून यातील 5 नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह कागदपत्रे तयार झाल्याचा गौप्यस्फोट रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे.
आत्तापर्यंत किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज हे मुंबई केंद्रित नेतेच राष्ट्रवादी विरुद्ध तोफा डागत होते. परंतु रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या तगडा गडी यामुळे पुन्हा एकदा राज्यात ईडीची वक्रदृष्टी राष्ट्रवादीकडे वळणार याचे संकेत मिळत आहेत.
सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्लिन चिट दिल्याचा आभास निर्माण केला जात असला तरी जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
पवार यांच्या लवासा प्रकरणावर देखील सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारल्याचे सांगताना या जमिनी देताना जलसंपदा मंत्री कोण होता? जमिनी कशा दिल्या असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. जलसंपदा मंत्रालयात अनेक प्रकरणात घोटाळे झाले असल्याचे आरोप असल्याने या चौकशा तर होणारच असा टोलाही निंबाळकर यांनी लगावला.
फलटण येथील एक बडा नेता कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाला जेलमध्ये जाण्यापेक्षा आता भाजपात गेलेले बरे असे सांगत सुटला असला तरी कृष्ण खोरे महामंडळात अनेक फाईलवर साह्य केल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत असा टोला निंबाळकर यांनी लगावला.
आता भाजपमध्ये आला तरी या प्रकरणांच्या चौकशी होणार असा इशारा निंबाळकर यांनी दिला.
सोलापूर जिल्ह्यातील उजनीचे पाणी बारामतीकडे वळविण्याचा निर्णय आता कायमचा रद्द केला जाणार असून नीरेचे पाणी देखील पुन्हा दुष्काळी सांगोला आणि सोलापूरला परत मिळविले जाणार असल्याचे रणजित निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज