मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा कोरोना विषाणू संसर्गाबाबत प्रभाग २ मध्ये जनजागृती संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणू मुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरूवारी प्रभाग २ मध्ये प्रत्येक घरामध्ये हात स्वच्छ धुण्यासाठी लिक्वीड व जनजागृती करण्याकरिता माहीती पत्र वाटप करण्यात आले तसेच गेली २ दिवस गटारीवरती फंगीसाइड कीटकनाशके फवारणी करण्यात आले येणारे १५ दिवस अतिशय महत्वाची असल्याने सर्वनागरीकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांची काळजी घेणे महत्वाचे आहे.सर्वांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन पक्षनेते अजित जगताप यांनी केले.
तर शिर्के हॉस्पिटलचे डॉ.शरद शिर्के यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून मंगळवेढा पोलीस ठाण्यात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले आहे.
जाहिरात :
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज