mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; सोशल नेटवर्किंग फोरमचा उपक्रम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, शैक्षणिक
ऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; सोशल नेटवर्किंग फोरमचा उपक्रम

टीम मंगळवेढा टाईम्स । करोनाचे संकट वाढत असताना पेठ तालुक्यातील वाडी, वस्तीवर शाळा बंद आहेत. या मुलांनाभ्रमणध्वनीअभावी ऑनलाइन शिक्षणही दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत ३० गावांमध्ये घराघरात अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी सोशल नेटवर्किंग फोरमने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. 

हे साहित्य फोरमच्या ग्रामसमन्वयकांनी (एस.एन.एफ.) संकट काळात सामाजिक जबाबदारी निभावत जवळपास तीन हजार बालकांच्या घरापर्यंत पोहचवले. फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि पेठ तालुका समन्वयक रामदास शिंदे यांच्या पुढाकाराने गाव तेथे एस.एन.एफ. या अभियानात गावागावात सामाजिक कार्याची उर्मी असलेल्या युवकांना एकत्र करून भक्कम फळी तयार करण्यात आली. 

याच ग्राम समन्वयकांचे आयोजन, नियोजन आणि संयोजनातून शैक्षणिक साहित्य वाटपाची मोहीम  यशस्वी करण्यात आली. सोशल नेटवर्किंग फोरमच्या व्यासपीठावरून युवा  ग्राम समन्वयकांनी आपली जबाबदारी उत्तम रितीने बजावत आपल्याच बंधू-भगिनींना ज्ञानार्जनासाठी साहित्य पोहचविले. फोरमचे प्रमुख गायकवाड यांनी एस.एन.एफ. ग्रामसमन्वयक संकल्पना विषद केली. आदिवासी भागात आरोग्य, शिक्षण आणि पाण्याच्या अनेक समस्या असतात. 

या समस्या वेळेवर फोरमपर्यंत पोहोचल्या तर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करता येतात. यासाठी गाव तिथे ग्रामसमन्वयक ही संकल्पना आम्ही राबवली आहे. आनंदाची बाब म्हणजे या समन्वयांकडून अनेक समस्या आमच्यापर्यंत पोहोचू लागल्या आहेत. 

त्यापैकी काही सोडवण्यातही फोरम यशस्वी ठरत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा तालुक्यातील अनेक तरूणांनी या सामाजिक कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला आहे.

Distribution of educational materials to students deprived of online education;  Social Networking Forum Initiative

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra Maza

संबंधित बातम्या

कडेपठार चंपाषष्ठी अन्नदान सेवा ट्रस्ट, जुनागड-जेजुरी यांच्या वतीने मुक्ताई मतिमंद मुलांच्या बालगृहास सामाजिक संस्थेचा मायेचा आधार

कडेपठार चंपाषष्ठी अन्नदान सेवा ट्रस्ट, जुनागड-जेजुरी यांच्या वतीने मुक्ताई मतिमंद मुलांच्या बालगृहास सामाजिक संस्थेचा मायेचा आधार

January 27, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा; एका कॉलवर प्रश्न सुटणार

January 26, 2026
कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

कौतुकास्पद! जयराम आलदर यांना सोलापूर मुख्याध्यापक संघाने दिली मोठी जबाबदारी; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

January 20, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

अभिनव उपक्रम! मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या प्रभाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात अभ्यासाचा भोंगा सुरू; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहाटे वाजतो भोंगा

January 13, 2026
सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि सिनेअभिनेते संदीप पाठक आज थेट ‘भालेवाडी’करांच्या भेटीला; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मिळणार बळ

सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि सिनेअभिनेते संदीप पाठक आज थेट ‘भालेवाडी’करांच्या भेटीला; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मिळणार बळ

January 8, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

कामाची बातमी! एकदा आरक्षणाचा फायदा घेतला तर खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

January 16, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शिष्यवृत्ती परीक्षा सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी; तारखेचीही घोषणा…

January 7, 2026
“मिल्क ॲन्ड मिलेट व्हिलेज” भालेवाडीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल व हुरडा पार्टी; सरपंच दवले यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन; महाराजांचा पोवाडा सादर करून कार्यक्रमात रंगत

“मिल्क ॲन्ड मिलेट व्हिलेज” भालेवाडीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल व हुरडा पार्टी; सरपंच दवले यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन; महाराजांचा पोवाडा सादर करून कार्यक्रमात रंगत

January 7, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

आदर्शवत निर्णय! विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल

January 5, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून 'ही' असणार, 'या' नियमांचे असणार बंधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा