मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
महसूल विभागाच्या पुणे आयुक्तांच्या जीआरमुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूल विभागाचे पुणे आयुक्त यांच्याकडून तत्काळ सेवा पंधरवडा राबवण्याच्या सूचना देण्यात आली आहे.
सेवा पंधरवड्यात प्रत्येक तालुक्यात मराठा आरक्षणाबाबत शासनातर्फे जाहीर शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात किमान 1000 प्रमाणपत्र वाटप करण्याच्या आयुक्तांच्या सूचना आहेत.
मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी जीआर लागू करण्यात आला. हैदराबाद गॅझेट केवळ औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड व धाराशिव, हिंगोली, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे.
महसूल आयुक्त पुणे यांनी मात्र सदर दाखले देण्यासाठी सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याला देखील सूचना केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पुणे आयुक्तांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्हा महसूल कार्यालयाने काढलेले परिपत्रक एबीपी माझाच्या हाती आले आहे.
काय म्हटलंय परिपत्रकात?
महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळयाच्या विषयांशी अत्यंत जवळून संबंध असलेला विभाग आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे.
ही बाब विचारात घेऊन भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा आगामी जन्मदिन दि. 17 सप्टेंबर, 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 02 ऑक्टोंबर, 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत “सेवा पंधरवडा” साजरा करणेबाबतची वाब शासनाच्या विचाराधीन होती.
सेवा पंधरवाड्यात राबवावयाचे उपक्रम हे यापूर्वीपासून राबविण्यात येत असून पंधरवड्या दरम्यान व त्यानंतरही निरंतरपणे राबविले जाणारे उपक्रम आहेत. मात्र या कालावधीत शासन निर्णय, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई क्र. मराअ-2025/प्र.क्र.63 (ई.ऑ.क्र. 1296378) समन्वय-1दि. 1.9.2025 अन्वये सदर उपक्रम मोहिम स्वरुपात युद्धपातळीवर राववायाचे आहेत.
त्यानुषंगाने मा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांनी दि. 03/09/2025 रोजीच्या बैठकीमध्ये सेवा पंधरवडा प्रभावी पद्धतीने राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख, सोलापूर.
सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व उप अधिक्षक, भूमी अभिलेख यांनी तात्काळ नियोजन करून दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर हा सेवा पंधरवड्याचा कालावधी असला तरी त्यातील विषयांची व्याप्ती लक्षात घेता त्यावर तात्काळ कामकाज सुरु करावे जेणे करुन सेवा पंधरवड्यातील फलनिष्पत्ती संख्यात्मक व गुणात्मकरित्या परिणामकारक होईल. त्यादृष्टीने सर्व संबंधित अधिकारी यांनी खालील विषयाबाबत नियोजन आराखडा तयार करुन आजच या कार्यालयास सादर करावा.
– विवादग्रस्त अविवादग्रसत नोंदी निर्गत करणे, त्याबाबत कॅम्प राबवून दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 पर्यंत विवादग्रस्त नोंदी 10% वर अविवादग्रस्त नोंदी 0.5% वर आणणे,
– दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानात सर्व गावांमध्ये 7/12 वाचन करणे.
– गाव तिथे स्मशानभूमी अभियान अंतर्गत ज्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही तेथे बक्षीसपत्र वा ग्रामपंचायत मार्फत – – – – खाजगी जागा अथवा असल्यास शासकीय जागा उपलब्ध करुन देणे.
– शासकीय जमीन land Bank Degitization (Update) करणे.
– मराठा आरक्षणाबाबत शासनातर्फे जाहीर शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात किमान 1000 प्रमाणपत्र वाटप करणे,
– अनुकंपा भरतीची कार्यवाही पूर्ण करणे
– VINT जमातीसाठी विविध प्रकारचे दाखले देणेसाठी कॅम्प आयोजित करणे.
– 29 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करणे. रस्ते अदालत आयोजन करणे अथवा त्याचे Geo – – — tagging करणे, त्याबाबत कुठल्याही प्रकारचा वाद नाही अशा रस्त्यांची नोंद इतर अधिकारात घेणे. पाणंद रस्त्यांना क्रमांक देणे,
– Third gender एकट्या महिला व आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचेसाठी सर्व प्रकारच्या योजनांचा लाभदेणे.
– ASSK केंद्र बंद असलेल्या ठिकाणी नवीन वाटप करणे,
– आयुष्यमान भारत कार्ड वाटप कॅम्प आयोजन.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज