दुबई । तानाजी गोरड
जगभरात कोरोनाचं थैमान सुरु आहे,ह्याच पार्श्वभूमीवर कोरोनाला आवर घालण्यासाठी दुबई प्रशासनाने अतिशय धाडसी निर्णय घेतला आहे.
दुबई पोलिसांकडुन आज सायंकाळ पासुन दुबईतील सर्व नागरिकांच्या मोबाईल वर अलार्म सह अलर्ट जारी करण्यात आला.प्रत्येकाच्या फोन वर काही सेंकदासाठी विशिष्ट प्रकारचा अलार्म वाजत होता सोबतच ह्या अलार्म मध्ये रात्री ८ ते सकाळी ६ पर्यंत घराबाहेर पडु नका असा संदेश लिखित व आॅडिओ ह्या दोन्ही स्वरुपात सोडण्यात आला.
दुबईने संपुर्ण शहर ,परिसर तसेच पब्लिक बसेस, मेट्रो सर्व निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
ह्यासाठी दुबईला भरपुर पैसे मोजावे लागत आहेत मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.दुबई ने संपुर्ण शहर निर्जंतुकीकरण केल्यानंतर दुबईतील कोरोना संपुष्टात येण्याची शक्यता आहे
ह्या अगोदर दुबईने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शॉपिंग मॉल, शाळा, कॉलेजेस, सर्व फेसटीवल बंद केले आहेत तसेच प्रायवेट सेक्टर मधील काही कंपन्या ही वर्क फ्रॉम होम सुरु करुन सहकार्य करत आहेत.
दोन दिवसापूर्वी दुबईने होम डिलिव्हरी चालु ठेवत संपुर्ण रेस्टॉरंट, कॉफीशॉप बंद ठेवले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज