टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरण ओव्हरप्लो झाले असून सध्या दौंडवरून उजनीत ७० हजार क्युसेकने आवक आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत ६० हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
त्यामुळे भीमा नदी काठावरील नागरिकांना उजनी धरण व्यवस्थापन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून दौंडवरून उजनी धरणात मोठा विसर्ग जमा होत आहे. त्याअनुषंगाने धरणातील उपयुक्त साठा क्षमतेपेक्षा जास्त होणार असल्याने नदीतून पाणी सोडले जात आहे.
रविवारी रात्री आठ वाजता धरणातून सोडलेला विसर्ग ५० हजारांवरून ६० हजार करण्यात आला आहे.
याशिवाय धरणावरील विद्युतगृहासाठी १६०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी जास्त होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत.
वीर अन् उजनीचा मिळून १.२४ लाख क्युसेकचा विसर्ग
दरम्यान, वीर धरणातूनही ६३ हजार क्युसेकचा विसर्ग नदीत सोडला आहे. पुढील २० ते २५ तासांत (सोमवारी संध्याकाळी सहानंतर) तो विसर्ग आणि उजनी धरणातून सोडलेला ६१ हजार क्युसेकचा तो विसर्ग आज पंढरपूरजवळ भीमा नदी पात्रात जमा होईल. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
पाऊस मुसळधार, राज्यातील धरणे टक्के भरली,
राज्यातील अनेक भागात पावसाचे दमदार कमबॅक झाले आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास ८० टक्के धरणे भरली आहेत. २५ ऑगस्ट रोजी राज्यातील कुठल्या धरणात किती पाणी आहे, हे जाणून घेऊयात…
—– पुणे विभाग ——-
चासकमान:(ऊ)::७.५७०TMC/१००.००%
पानशेत(ऊ):::: १०.३२० TMC/९६.९१%
खडकवास(ऊ):१.५३० TMC/७७.७३%
भाटघर:(ऊ):२३.५० TMC/१००.००%
वीर::::::(ऊ):: ९.४१० TMC/१००.००%
मुळशी::(ऊ):१९.१८० TMC/९५.१८%
पवना ::(ऊ):: ८.४१० TMC/९८.८७%
—- उजनी धरण —
एकुण::: ११८.५४ TMC/१०१.१०%
(ऊप):: ५४.८८० TMC/१०२.४५%
—- कोयना धरण —-
एकुण:::::::९२.०७० TMC/८६.५५%
उपयुक्त::::::८६.९३० TMC/८६.८३%.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज